August 9, 2025

मराठा समाजाबद्ल अपशब्द वापरले संतोष भांडे यांच्यावर गुन्हा दाखल

  • कळंब (राजेंद्र बारगुले ) – शासकिय आवारात उभे राहुन मराठा समाजाची बदनामी केलेल्या संतोष भांडे यांच्यावर कळंब पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
    दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या भांडे वर गुन्हा दाखल करण्यात यावा या साठी सकल मराठा समाज मोठ्या संख्येने पोलिस स्टेशन मध्ये बसून होता.राहुल यादव पाटील यांच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    कळंब शहर व तालुक्यातील मराठा व ओबिसी समाज राज्यातील घटनांकडे लक्ष न देता गुण्या गोविंदाने राहत असताना राजकिय स्वार्थापोटी
    संतोष भांडे नामक समाजकंटकाने कळंब तहसिल आवारात उभा राहुन एक भाषन केल्याची क्लिप सोशल माध्यमांवर फिरत आहे यात संतोष भांडे अखंड मराठा समाजाला दळभद्री व कर्मदरीद्री म्हणुन हिनवत असल्याचे या क्लिपच्या माध्यमातुन समजले,मराठा समाज आपल्या न्याय हक्कासाठी शांततेच्या मार्गाने आपला लढत असताना कळंब शहरातील व तालुक्यातील शांतता कायम रहावी यासाठी सतत प्रयत्नशिल आहे पण असे काही समाजकंटक भडक भाषणं करुन समाजातील युवकांना भडकवुन दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत याची चौकशी करण्याची मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने राहुल यादव पाटील यांनी केली. या नंतर अटक करावी अशी मागणी केली असून, या तक्रारी नंतर कळंब पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्हा दाखल होई पर्यंत मराठा समाज पोलिस स्टेशनच्या आवांरात बसून होता.
error: Content is protected !!