August 8, 2025

जिल्हास्तरीय वार्षिक अधिवेशनात गुणवंत शिक्षक पुरस्कार उत्साहात संपन्न

  • कळंब तालुक्यातील प्रदिप यादव व जाफर पठाण गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

  • कळंब (माधवसिंग राजपूत) – दिनांक 4 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी विद्यालय बलसुर तालुका उमरगा येथे अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला समिती जिल्हा धाराशिव,साने गुरुजी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त साने गुरुजी कथा मालेच्या वार्षिक अधिवेशनात गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन केले .विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायन करून प्रमुख पाहुण्याचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण तज्ञ एम.डी.देशमुख,प्रमुख पाहुणे शिक्षक आमदार विक्रम काळे,शामराव कराळे,ज्येष्ठ समाजसेवक विचारवंत पन्नालालजी सुराणा , कमलाकरराव भोसले, अ. भा.साने गुरुजी कथा मालेचे जिल्हाध्यक्ष डी.के.कुलकर्णी , धाराशिव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश टेकाळे,शामराव कराळे अ. भा. क. समिती मुंबई, लालासाहेब पाटील आं. भा.कथामांला समिती मुंबई कार्याध्यक्ष, सुनील पुजारी , स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड, छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीपाद कुलकर्णी , डॉ. बी .आर पाटील अध्यक्ष मराठवाडा जेष्ठ ना .संघ , श्रीहरी जाधव मुंबई, सुदर्शन शिंदे मुंबई, डॉ.रामजीवन भांगडिया लातूर, के.डी.कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदिप लालासाहेब यादव (सहशिक्षक श्री संत बोधले महाराज प्रा. विद्यामंदिर डिकसळ ) व जाफर नायबखान पठाण (प्राचार्य सावित्रीबाई फुले विद्यालय कळंब) यांना साने गुरुजी कथामाला ट्रॉफी ,मानपत्र, शाल ,श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला. आमदार विक्रम काळे म्हणाले की, साने गुरुजी यांचे विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.शामराव कराळे यांनी साने गुरुजी चे कार्य व विचार सांगितले तर पन्नालाल सुराणा यांनी भारतीय संस्कृती सत्य हाच ईश्वर नीतिमत्ता यांची माहिती सांगितली.डी.के.कुलकर्णी म्हणाले की, आजचा युवक संस्कारक्षम असणे गरजेचे आहे व प्रत्येक शाळेत साने गुरुजी कथामाला कळंब तालुका चालवतो. या कार्यक्रमाला कळंब तालुक्यातून सोपान पवार, ज्ञानेश्वर तोडकर ,मुंडे सर सावित्रीबाई फुले शाळेच्या माजी प्राचार्या मनोरमा शेळके , लिंबराज पाडे, अभय खंडागळे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनंत सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.पी .बी. सूर्यवंशी यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. श्रीहरी जाधव यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!