February 8, 2026

वेद शैक्षणिक संकुलात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

  • कळंब  (राजेंद्र बारगुले ) – धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील छत्रपती संभाजी राजे नगरातील वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ अध्यापक व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मैदानात दि.२६ जाने २०२४ रोजी ७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
    यावेळी भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तमाम देशवासीयांची आण-बाण- शान असलेल्या तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण प्राचार्य सतिश मातने यांच्या हस्ते करण्यात आले.
    याप्रसंगी विद्यालयीन विविध क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना प्रशस्तीपत्रकांचे वितरण करण्यात आले. व प्रशिक्षण संस्थेतील कोपा या ट्रेडमधील निदेशक सागर पालके यांचे यूजीसी नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.
    यावेळी भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अभिषेक यादव यांनी देशभक्तीपर गीत म्हटले तर सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके यांनी कविता सादर केली.
    भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने व प्रा.श्रीकांत पवार यांनी प्रशिक्षणार्थींना भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणजे काय हे सांगून संविधानाचे महत्व सांगितले.
    याप्रसंगी प्रा.मोहिनी शिंदे,भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सूरज भांडे,निदेशक विनोद जाधव,निदेशिका कोमल मगर,लिपिक आदित्य गायकवाड, विनोद कसबे,सोनाली ढमाले आदींची उपस्थिती होती.

error: Content is protected !!