August 8, 2025

संविधान दिन गुन्हे दाखल करण्यास विलंब कळंब तहसीलदार विरुद्ध धरणे आंदोलन

  • ज्या शासकीय कार्यालयांनी संविधान दिन साजरा केलाच नसेल ते अहवाल दाखल करतील कसे ? – राहुल मुळे
  • कळंब (राजेंद्र बारगुले ) – शहरातील शासकीय कार्यालयात २६ नोव्हेंबर रोजी, संविधान दिन साजरा न करणाऱ्या शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्या विरुद्ध चौकशीअंति भारतीय दंड संहिता १८६० कलम १८८ नुसार गुन्हे दाखल करावेत अशी पुराव्यासह तक्रार तहसीलदार यांच्याकडे कळंब येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल मुळे यांनी केली होती. त्यावर तहसीलदार यांच्याकडून कळंब शहरातील २१ शासकीय कार्यालयांना संविधान दिन साजरा केला किंवा कसे याचा फोटोसह स्वयंस्पष्ट अहवाल तात्काळ २ दिवसाच्या आत सादर करावा असे नोटिस द्वारे कळविले होते. परंतु त्या नोटिसला २ महिने झाले तरीही अनेक शासकीय कार्यालयानी अहवाल सादर केला नाही.
    संविधान दिन प्रकरणी अहवाल सादर न करणाऱ्या शासकीय कार्यालय विरुद्ध विनाविलंब तात्काळ कायदेशीर कार्यवाही सुरू करणे अवश्यक असताना तहसील कार्यालय कळंब कडून जाणीवपूर्वक वेळ काढू पणा करून विलंब केला जातोय का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. संविधान दिन याविषयी दाखल केलेल्या तक्रार प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते राहुल मुळे यांनी प्रजासत्ताक दिनी तहसील कार्यालय कळंब येथील पायऱ्यावर हातात संविधान घेत डोळ्याला काळी पट्टी बांधून कळंब तहसीलदार यांचा निषेध म्हणून धरणे आंदोलन केले.
error: Content is protected !!