कळंब- तालुक्यातील हसेगाव (के) येथे दि.२५ जानेवारी २०२४ रोजी दुपारी तीन वाजता पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते ए व्ही पी इन्फ्रास्ट्रक्चर सोल्युशन आर एम सी प्लॅन्टचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या सोहळ्यास राज्याचे रो ह यो मंत्री ना.संदिपानजी भुमरे, तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास तालुक्यातील सर्वानी उपस्थित रहाण्याचे आवाहन ए व्ही पी चे मुख्य संचालक तथा बाजार समितीचे संचालक विलास विश्वंभरराव पाटील यांनी केले आहे.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी