कळंब – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या २२ वर्षीय युवकाने चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना कळंब तालुक्यातील हळदगाव येथे शुक्रवारी संध्याकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. प्रतिक रजनित सावंत अस आत्महत्या केलेल्या युवकाच नाव असुन शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मराठा आरक्षण मिळावे यासाठी मी प्रतिक रंजित सावंत आत्महत्या करत आहे,आरक्षण मिळालच पाहिजे मी माझे आयुष्य याच्यासाठी संपवत आहे तरी सरकारने याची दखल घ्यावी.. एक मराठा, लाख मराठा अशा आशयाची चिठ्ठी लिहुन युवकांने आत्महत्या केली आहे. धाराशिव जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी दोन दिवसातील ही दुसरी आत्महत्या आहे त्यामुळे सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावुन तरुणांच्या होणाऱ्या आत्महत्या थांबवाव्यात अशी मागणी मराठा समाज बांधवांनी केली आहे.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड