August 9, 2025

जनकल्याण अर्बन को-ऑप. बँक लि.कळंब च्या “फ्रँकिंग” सेवेचा लवकरच आरंभ

  • कळंब – सचोटी,सौजन्य, स्वाभिमान असे ब्रिदवाक्य घेऊन गेल्या २८ वर्षांपासून एकूण ७ शाखेंसह सुरु असलेल्या जनकल्याण अर्बन को-ऑप. बँक लि. कळंब च्या फ्रँकिंग सेवेचा आरंभ मंगळवार दिनांक २३ जानेवारी २०२४ रोजी, दुपारी १ वाजता गोपीनाथ कोळेकर (नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनिबंधक,लातूर) यांच्या हस्ते उदघाटन करून सुरु होत आहे. बँकेच्या कळंब येथील मुख्य कार्यालयामध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे.
    फ्रँकिंग म्हणजेच कायदेशीर मालमत्तेच्या कागदपत्रांवर शिक्का मारण्याच्या प्रक्रियेचा संदर्भ देते. फ्रँकिंग हे अधिकृत बँकांद्वारे केले जाते, जे एकतर तुमच्या दस्तऐवजांवर शिक्का मारतात.फ्रँकिंग अनेकदा फ्रँकिंग मशीन वापरून चालते. असे यंत्राने बनवलेले मुद्रांक हे तुम्ही तुमचे मुद्रांक शुल्क भरले असल्याचा पुरावा असते.
    थोडक्यात काय तर मुद्रांक विक्रेत्याकडे जाऊन मुद्रांक खरेदी करणे,त्यावर आपला मजकूर टाईप करून घेणे यापासून ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. साध्या पेपर वर टाईप केलेला मजकूर या फ्रँकिंग सुविधेद्वारे मुद्रांकामध्ये परिवर्तित होतो. धाराशिव जिल्ह्यामध्ये हि सुविधा सुरु करणारी पहिली बँक असल्याचा मान जनकल्याण अर्बन को-ऑप.बँक लि. कळंब ला मिळाला आहे हे विशेष. कळंब, धाराशिव व लातूर या ३ शाखांमध्ये ही सुविधा २३ जानेवारी पासून सुरु होत आहे. या बँकेच्या IMPS, UPI व Mobile Banking या अत्याधुनिक सुविधाही लवकरच सुरु होणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष उमेश (दादा) कुलकर्णी यांनी दिली.
    बँकेच्या सर्व सभासद, ग्राहक आणि हितचिंतकानी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती बँकेच्या सर्व संचालक मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी व्हि. एम. पेकमवार यांनी केली आहे.
error: Content is protected !!