कळंब (जयनारायण दरक) – बीट स्तरीय क्रीडा स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात कळंब तालुक्यातील सात्रा शाळेच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून कळंब तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत सुद्धा ही विजयी घोडदौड सुरूच ठेवली. कळंब येथे झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत सात्रा शाळेचा मुलांचा संघ उपविजेता ठरला.याच तालुकास्तरीय स्पर्धेत ४०० मीटर धावणे क्रिडाप्रकारात शाळेचा अथर्व विष्णू शिंदे या खेळाडूने प्रथम क्रमांक पटकावला.तसेच १०० मीटर धावणे स्पर्धेत अथर्व शिंदे याने पुन्हा प्रथम क्रमांक मिळविला. मुलींच्या उंच उडी स्पर्धेत कु.सानिका गणेश शिंदे हिने तृतीय क्रमांक व मुलांमध्ये अथर्व शिंदे याने तृतीय क्रमांक मिळविला. या यशस्वी खेळाडूंना शिक्षक राजेंद्र पवार, दिलीप पवार, शिक्षिका सुरेखा चोभारकर, इंदूताई वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी खेळाडूंना रजिस्टर, पेन व गुलाब फूल देऊन कृषी उत्पन्न बाजार समिती कळंबचे माजी सभापती लक्ष्मण तात्या थोरबोले,भागवत शिंदे,सागर चिंचकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.अनेक खेळांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अथर्व विष्णू शिंदे यास शिक्षक राजेंद्र पवार यांनी रनिंग बूट व साॅक्स बक्षीस म्हणून दिले. शाळेतील विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल ईटकूर बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी सुशील फुलारी ईटकूर केंद्राचे केंद्र प्रमुख पांडूरंग गामोड,शाळेचे मुख्याध्यापक दिपक कसबे,कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण तात्या थोरबोले,सरपंच रूपाली चव्हाण,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुदर्शन शिंदे, उपाध्यक्ष बालाजी वाघमारे यांनी अभिनंदन केले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले