कळंब – श्री. संत गुरू रविदास महाराज जयंती उत्सव हा दि.३ मार्च २०२४ रोजी गुरू रविदास महाराज मंदिर कळंब या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे. यासंदर्भात राष्ट्रीय चर्मकार महासंघाची नुकतीच एक बैठक राष्ट्रीय चर्मकार महासंघ जनसंपर्क कार्यालय कळंब येथे विकास कदम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी जयंती उत्सव समिती-२०२४ स्थापना करण्यात आली. यावेळी नवनियुक्त जयंती समितीचे अध्यक्ष बाबासाहेब कांबळे,उपाध्यक्ष विनोद बेळगावकर व गोकुळ शिंदे, सचिव जनार्दन शिंदे, सहसचिव विलास सुरवसे व विक्रम शेवाळे, कार्याध्यक्ष बालाजी साबळे व भिकचंद शेवाळे, कोषाध्यक्ष शिवाजी शिंदे व लिंबराज ठोंबरे, सल्लागार रंगनाथ कदम व महादेव ठोंबरे, कार्यक्रम प्रमुख सतिश कदम व रुपचंद लोहकरे, समन्वयक श्याम शिंदे व बाबा शिंदे तर मार्गदर्शक कमिटीत बाबुराव पाखरे,अभिजीत बोबडे, श्याम शिंदे,वाघमारे यांची निवड करण्यात आली. या बैठकीस राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. जालिंदर लोहकरे, महिला जिल्हाध्यक्षा आशा राऊत यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले