August 9, 2025

रासेयो शिबिरात वृक्षारोपन

  • कळंब – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर आणि शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ.सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या युवकांचा ध्यास ग्राम- शहर विकास हे सात दिवसीय शिबिर ज्ञान प्रसारक मंडळाचे तालुक्यातील डिकसळ येथे संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने शिबिराच्या पाचव्या दिवशी दि.२१ जानेवारी २०२४ वार रविवार रोजी सकाळी ११.०० वाजता विद्यापीठाच्या झाडे लावा- झाडे जगवा, वृक्षरोपण व वृक्ष संवर्धन करा या वर्षीच्या वार्षिक शिबिराच्या घोष वाक्यानुसार शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या क्रीडांगण परिसरात मौजे डिकसळ येथे रासेयोच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले आणि त्यानंतर डिकसळ गावातील ग्रामपंचायत कार्यालय येथे लावण्यात आलेल्या झाडांच्या आळ्यातील तण काढून झाडांना पाणी देण्यात आले . यावेळी लेफ्टनंट.डॉ.हरिभाऊ पावडे,डॉ.श्रीकांत भोसले,प्रा. अमोल शिंदे,डॉ.समाधान चंदनशिवे, व कार्यक्रम अधिकारी डॉ.मीनाक्षी जाधव, डॉ. संदीप महाजन व डॉ.नामानंद साठे ,हनुमंत जाधव अधीक्षक तथा अध्यक्ष,तंटामुक्ती समिती मौजे डिकसळ ,अर्जुन वाघमारे, दिलीप,कमलाकर बंडगर ,विपुल धाकतोडे,आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!