February 9, 2026

साहित्यिकांनी प्रसिध्दीच्या मागे न लागता लिहावे – डॉ.श्रीकांत पाटील

  • कळंब – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय  यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष -(२०२३-२४) नवोदित लेखकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळा ही ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेतून व प्राचार्य डॉ.सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक प्रसिद्ध कांदबरीकार डॉ.श्रीकांत पाटील, कोल्हापूर बोलत होते.
    पुढे ते म्हणाले,”महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी अत्यंत सोप्या भाषेत व्याकरण, लेखन असाव? लेखकांनी कविता, कादंबरी, चरित्र आणि आत्मचरित्र लेखनासाठी बंधन नसावे, जसे आहे तसे वास्तव रुचेल पचेल अशा विषयांवर लिहिल्यावर तुम्ही आपोआप प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहचता. असे सांगून अत्यंत मार्मिक असे दाखले देत विद्यार्थ्यांना लिहिते व्हा, असा मौलिक संदेश आपल्या भाषणातून प्रेरणा दिली.
       प्रारंभी मराठी विभाग प्रमुख डॉ. दादाराव गुंडरे यांनी प्रास्ताविक केले. समन्वयक प्रा.डॉ. दिपक सुर्यवंशी यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन  स्वागत केले. व्यासपीठावर ज्येष्ठ कांदबरीकार  डॉ.श्रीकांत पाटील, श्री. सोपान पवार, डॉ.संजय कांबळे (अधिसभा सदस्य, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छ्त्रपती संभाजीनगर) प्राचार्य डॉ.सुनिल पवार आदी उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांचे हस्ते संस्थेचे संस्थापक ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
    नवोदित लेखकासाठी कार्यशाळेचे उद्घाटन डॉ.संजय कांबळे यांच्या हस्ते झाले, यावेळी ते म्हणाले, “आजच्या लेखकांनी लिहिण्यासाठी वर्तमान वास्तव समजून घेऊन लिहावे, चंद्र, तारे, नदी, डोंगर , निसर्ग आणि पर्यटन यावर न लिहिता आजच्या ज्वलंत प्रश्नांवर लिहावे. साहित्य हा समाजाचा आरसा असतो, म्हणून खरे तेच लेखनातून समोर आले पाहिजे. यासारख्या नवीन चिकित्सक लेखक निर्माण होणे, ही काळाची गरज आहे. तर श्री सोपान पवार यांनी कथा, कविता आणि कादंबरीचे लेखन संहिता, लेखनाचा आकृतीबंध याविषयी अनेक दाखले देत मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. सुनिल पवार यांनी , सूत्रसंचालन कार्यशाळा समन्वयक प्रा. डॉ. दिपक सुर्यवंशी तर डॉ. नामानंद साठे यांनी आभार मानले. यावेळी प्रा.नितीन अंकुशराव, डॉ. ईश्वर राठोड, डॉ. एन.एम.अदाटे, प्रा.डॉ.मीनाक्षी जाधव, प्रा.सरस्वती बोंदर, प्रा. घाटपारडे, प्रा. ज्योती टिपरसे, प्रा. राजेश दळवे, प्रा. पंडीत, प्रा. शाहरुख शेख, आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  हनुमंत जाधव, प्रकाश गायकवाड, अरविंद शिंदे, संतोष मोरे, संदीप सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!