न.प.च्या कर्तव्यदक्षतेने, भाजी-पाला बाजाराचे योग्य नियोजन..!
कळंब (महेश फाटक ) – येथील रविवारचा भाजी-पाला बाजार जुने पोलीस स्टेशन ते बार्शी रोड पर्यंत रहदारीच्या रस्त्यावरच भरत असल्याने वाहतुकीस अडथळा होत असल्याने भाजी-पाला घेणाऱ्यांना जीव मुठीत धरून तारेवरची कसरत करावी लागत होती.याकडे न.प. प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते.रोडच्या एका बाजूला स्टेडियमचे मैदान तर दुसऱ्या बाजूला न.प. शाळा क्र.१ चे मैदान रिकामेच होते.साक्षी पावन ज्योत मधून होत असलेल्या गैरसोयीबद्दल न.प.प्रशासनाचे लक्ष वेधले असता अवघ्या पंधरा दिवसांत न.प.प्रशासनाने योग्य नियोजन करून न.प.शाळेच्या मैदानात बाजार भरवला असल्याने नागरिकांना आता स्वच्छंदपणे भाजी-पाला खरेदी करत येऊ लागल्याने समाधान व्यक्त होत आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेतल्याने सा.साक्षी पावन ज्योतकडून न.प.प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले