कळंब (जयनारायण दरक ) – अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज नानिजधाम(महाराष्ट्र) व मराठवाडा पीठ श्री क्षेत्र सिमुरगव्हाण (ता.पाथरी जि. परभणी) येथे दिनांक २५ ते २९ डिसेंबर या कालावधी मध्ये श्री दत्त जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री दत्त जयंती वारी उत्सव सोहळ्यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत.अशी माहिती मराठवाड्याचे पीठ व्यवस्थापक गणेश मोरे व प्रवीण गायकवाड यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे . या मध्ये दि.२५ डिसेंबर रोजी नामसप्ताह रात्री ९ ते सकाळी ६ वाजेर्यंत नामसप्ताह आयोजित करण्यात आला आहे. व सोमवारी व मंगळवारी अन्नदान व दत्तयाग कार्यक्रम होणार आहे. दि.२६ मंगळवार रोजी श्री.दत्त जयंती व जन्मोत्सव सोहळा दिवशी पहाटे ५ वा काकडा आरतीने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. सायंकाळी ठीक ५ ते ६ या वेळेत सामाजिक दुर्बल घटक यांना साहित्याचे वाटप विविध मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.जगद्गुरू माऊलीच्या उपस्थितीत दत्त जन्म सोहळा संपन्न होईल. श्री दत्त महाराजांची पालखी प्रदक्षिणा होईल. व जगद्गुरु श्री.स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज व परमपूज्य कानिफनाथ जी महाराज यांचा प्रवचन संपन्न होणार आहे. याच बरोबर दि. २८ व २९ डिसेंबर रोजी समस्या मार्गदर्शन सोहळा व २९ डिसेंबर रोजी साधक दिक्षा देण्यात येणार आहे. श्री.दत्तजयंती वारी उत्सव सोहळा या उत्सवासाठी देशभरातून जवळपास दोन ते तीन लाख भाविक भक्त उपस्थित राहणार असल्याची माहिती मराठवाडा पीठ प्रमुख गणेश मोरे पीठ व्यवस्थापक प्रविंण गायकवाड व पीठ समिती यांनी दिली आहे. तरी धाराशिव जिल्ह्यातून जास्तीत जास्त भक्तगणांनी या दत्त जन्मोत्सव सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने श्री क्षेत्र शिमुरगव्हाण येथे उपस्थित रहावे व श्रींच्या प्रवचनाचा लाभ घ्यावा असे आव्हान धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा सेवा समितीचे अध्यक्ष संतोष केसकर यांनी केले आहे .
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले