मोहा – मराठवाड्यातील सुशिक्षित बेरोजगारांना हक्काचे रोजगार मिळवून देण्याचे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींची स्वप्नपूसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने अहोरात्र परिश्रम घेणारे मोहेकर उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत (तात्या) मडके यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील मोहा येथे कार्यरत असणाऱ्या शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहकर मल्टिस्टेटच्या नवीन वर्ष २०२४ च्या दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते २० डिसेंबर रोजी बुधवारी उत्साहात प्रकाशन करण्यात आले. यावेळी मोहेकर उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत (तात्या) मडके,मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल (बाबा)मडके,माजी सरपंच बाबा मडके, देवीनंदा ऍग्रोचे चेअरमन अतुल मडके, गावचे पोलीस पाटील प्रकाश गोरे, सेवा सोसायटीचे संचालक अच्युत मडके,आय टी प्रमुख प्रमोद मडके,प्रशासकीय अधिकारी श्रीकांत मडके,मुख्य अकाउंटंट इम्रान शेख, सुरज मडके,बँकेचे कर्ज विभाग प्रमुख अतुल मडके सह सर्व कर्मचारी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्तित होते. अर्थकारणाला सामाजिक बांधिलकीची जोड देत गेल्या ५२ वर्षांपासून सहकार क्षेत्रात चोख व पारदर्शक व्यवहारामुळे स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केलेली व मोहेकर मल्टिस्टेट या नावाने लोकांच्या विश्वासास पात्र ठरलेली कोऑप्रेटीव्ह के. सोसायटी लि. ही संस्था सध्या सहकार क्षेत्रात कोटीच्या कोटी उम्राने पार करत आहे जानेवारी २०१२ मध्ये सुरु करण्यात आलेल्या मोहेकर मल्टिस्टेटने प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकत विकासाचे जवळजवळ एक तप पूर्ण केले आहे.यशस्वी वाटचालीदरम्यान आर्थिक प्रगतीच्या दशेला दिशा देण्याचे व मार्गदर्शन करण्याचे काम संस्थापक अध्यक्ष हनुमंत मडके यांनी केले छोट्याशा उडीतून घेतलेली चेतनाची भरारी यशस्वी झाली असल्याने आज जनतेच्या विश्वासाची व भरवशाची संस्था म्हणून सर्वत्र परिचित झाली आहे. बाराव्या वर्षात दमदार पदार्पण करत असताना आपल्या सर्वोत्कृष्ट सेवेतून यशस्वी वाटचाल करत अवघ्या ५२ वर्षात कोट्यावाधीची वाटचाल करणारी जिल्ह्यात एकमेव मल्टिस्टेट झाली आहे. व्यवहारातील पारदर्शकता आणि ग्राहकांचा असलेला अतूट विश्वास यावरच मल्टिस्टेट ची प्रगती व नावलौकीकता वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आर्थिक जडणघड निमध्ये मल्टिस्टेट चे मोठे योगदान आहे. मल्टिस्टेट च्या माध्यमातून अनेक योजना त्यांनी राबावल्या व कमालीचे यशस्वी झाले.केवळ महाराष्ट्रातच नाही तर मोहेकर मल्टिस्टेटचे कार्यक्षेत्र महाराष्ट्राच्या बाहेर विस्थारीत करण्यात आले असून कर्नाटक राज्यात शाखेचे नुकतेच उदघाटन केले आहे. शाखेच्या माध्यमातून लोकसेवेचा वसा चालवला जात आहे काळाची पावले ओळखून कामाचे नियोजन करत सतत एक पाऊल टाकत यावर्षीच्या नवीन वर्षाच्या २०२४ च्या दिनदर्शिकेचे अनावरण उत्साहात केले आहे.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर