कळंब – येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील चि.सुरज उत्तरेश्वर गायकवाड व चि.पार्थ सुरेश वाघमारे या दोन खेळाडूंची राष्ट्रीय शालेय नेटबॉल स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्य संघांत नुकतीच निवड जाहीर करण्यात आली आहे. नुकत्याच धुळे येथे 17 वर्षे वयोगटातील मुलांच्या राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेमधून राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी महाराष्ट्र राज्य संघाची निवड करण्यात आली या संघामध्ये चि.सुरज गायकवाड याची निवड झाली असून चतुरचंद विद्यालय बारामती येथे झालेल्या 19 वर्षे मुलांच्या राज्यस्तरीय स्पर्धेनंतर राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्राचा संघ निवडण्यात आला सदर स्पर्धनंतर चि.पार्थ सुरेश वाघमारे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. पुढील महिन्यात दिल्ली येथे होणाऱ्या 17 वर्षे गटातील राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेमध्ये सुरज गायकवाड हा महाराष्ट्र चे नेतृत्व करणार आहे.तर हरियाणा राज्यात होणाऱ्या 19 वर्षे वयोगटातील शालेय नेटबॉलच्या राष्ट्रीय स्पर्धेत पार्थ वाघमारे हा महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार आहे. या निवडीबद्दल दोन्ही विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक जयचंद कुपकर,उपप्राचार्या डॉ. मीनाक्षीताई शिंदे,उपमुख्याध्यापक जे.एन. पठाण यांनी सत्कार करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक तथा विभाग प्रमुख उत्तरेश्वर गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात