August 9, 2025

कु.मृदुला पोरे हिच्या वाढदिवसानिमित्त अनाथ मुलींना स्वेटर वाटप

  • कळंब – कळंब येथील संत ज्ञानेश्वर बालक आश्रम येथे आयोजित कार्यक्रमात आश्रमातील अनाथ मुलीना सेवानिवृत्त इंजि.अशोक पोरे यांनी नात मृदुला अतुल पोरे हिच्या वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटप केले.
    याप्रसंगी बोलताना अशोक पोरे यांनी महादेव महाराज अडसूळ हे अनाथ मुलांचा सांभाळ करून त्यांना मायेची उभ देत आहेत हे त्यांचे काम महान आहे.यामुळे आपणही या अनाथ मुलींना स्वेटर वाटप करावे असे वाटल्याने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. असे सांगितले याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मृदला पोरे हिला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमास आश्रम चालक महादेव महाराज अडसूळ,सुनीता देवी महाराज अडसूळ,अरुण जोशी,बसवराज राजमाने,ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत,श्रीकांत कांबळे यांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!