August 9, 2025

भजन व भारुड गायन कार्यक्रम संपन्न

कळंब (महेश फाटक यांजकडून ) – कामगार कल्याण केंद्र गट कार्यालय लातूर अंतर्गत कामगार कल्याण केंद्र कळंब येथे दि.11 डिसेंबर रोजी संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळा संपन्न झाला यानिमित्त आयोजित कार्यक्रमात वारकरी साहित्य परिषदेच्या धाराशिव जिल्हाध्यक्ष ह.भ.प सुनीतादेवी महाराज अडसूळ यांच्या हस्ते श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर ह. भ.प. सुनीतादेवी महाराज अडसूळ यांनी व भजनी मंडळांनी भजन गायन केले तर भारुडकार रमाताई रत्नपारखी यांनी भारुड गायन सादर केले.या कार्यक्रमात भजनी मंडळाच्या संगीता मुंडे, विजया पांचाळ, छकुबाई कुंभार ,कीर्तीमला लोमटे ,शिवकन्या फल्ले,मंगल वीर, माधुरी पुरी, सुनंदा राऊत, सुकांता सुरवसे, त्यांचा समावेश होता भजनी मंडळाचे स्वागत महिला सहाय्यक संचालिका प्रतिज्ञा वरखेडकर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिनेश गिरी ,यशोदा शिंपले ,अनुजा कुलकर्णी, श्रीमती घाडगे यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!