मोहोळ (राजेंद्र बारगुले यांजकडून ) – येथील प्रगतशील शेतकरी कृषी पदवीधर शैलेश नंदकुमार वेदपाठक या तरुणाने ऊस उत्पादनात वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे.नवतंत्रज्ञानाची कास आणि जैविक खतांचा वापर करून यंदाच्या गळीत हंगामातही दोन एकर क्षेत्रांत २०० टन उसाचे विक्रमी उत्पादन घेऊन एकरी १०० टनाचे उद्दिष्ट साध्य करून शेतकऱ्यांसमोर आदर्श उभा केला आहे.ठिबकद्वारे खत व पाणी व्यवस्थापन अनेक वर्षांपासून शैलेश वेदपाठक शेतीमध्ये नावलौकिक मिळविला आहे. कमी क्षेत्रात जादा उत्पन्न घेण्याची त्रिसूत्री त्यांनी अवलंबली आहे. ऊस उत्पादनाबाबत ते म्हणाले, “येवती ता.मोहोळ जि.सोलापूर येथील उत्पादनाबरोबरच जमिनीचा पोत टिकवून ठेवणे या दुहेरी उद्देशाने जमिनीची पूर्व मशागत करून योग्य प्रमाणात शेणखत घातले. त्यानंतर डेंच्या हिरवळीचे खत घेऊन जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढविला. एक जुलै रोजी २ एकर जमिनीत को-८६०३२ जातीचे बियाणे वापरून एकडोळा पद्धतीने साडेचार फूट सरीमध्ये दोन फूट अंतरावर एक डोळा लागण बेसल डोस टाकून केली. भरणीनंतर ठिबकद्वारे खत व पाणी व्यवस्थापन केले. हुमणीची दक्षता घेऊन नुकसान टाळले. उसाची संख्या नियोजन करून एकरी उसाची संख्या अबाधित राखली.
या यशामुळे कृषी पदवीधर शैलेश वेदपाठकचे परिसरात सर्वत्र अभिनंदन होत आहे.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड