धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.10 डिसेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 90 कारवाया करुन 32,550 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
येरमाळा पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)सुभाष परमेश्वर बारसकर, वय 61 वर्षे, रा. येरमाळा, ता. कळंब जि. धाराशिव हे दि.10.12.2023 रोजी 17.45 वा. सु. येरमाळा ते बार्शी जाणारे रोडचे बाजूला कोठावळे पेट्रोलपंप समोरील मोकळ्या जागबेत येरमाळा येथे अंदाजे 1,300 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 13 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. 2)जयश्री काकासाहेब वाघमारे, वय 45 वर्षे, रा. गौर, ता. कळंब जि. धाराशिव हे दि.10.12.2023 रोजी 17.30 वा. सु. आपल्या राहात्या घरासमोर अंदाजे 630 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 09 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये येरमाळा पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
“ जुगार विरोधी कारवाई.”
येरमाळा पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान येरमाळा पोलीसांनी दि.10.12.2023 रोजी 15.00 वा. सु. येरमाळा पो. ठा. हद्दीत येडेश्वरी मंदीर येरमाळा परिसरात छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)स्वप्नील रामेश्वर सुतकर, वय 19 वर्षे, रा. रामलिंग नगर येडशी, ता.जि. धाराशिव हे 15.00 वा. सु. येडेश्वरी मंदीर येरमाळा परिसरात येरमाळा येथे टायगर मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 2,500 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव शहर पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव शहर पोलीसांनी दि.10.12.2023 रोजी 17.50 वा. सु. धाराशिव शहर पो. ठा. हद्दीत वैराग रोड लगतचे मागासर्वीय मुलांचे वस्तीगृह शेजारी पांढरीवस्ती कच्च्या रस्त्याच्या बाजूस साळुंके यांचे कोट्याजवळ पत्राचे शेडचे पाठीमागील बाजूस छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)अनवर जानी पठाण,वय 27 वर्षे, रा. खाजा नगर धाराशिव, 2)अकरम अनवर नाईकवाडी, वय 22 वर्षे, 3)नुमन शफीक मोमीन, वय 20 वर्षे, दोघे रा. फकीरा नगर वैराग नाका धाराशिव ता.जि. धाराशिव 4)खंडू शाहु कांबळे, वय 35 वर्षे, रा. खानापूर ता. जि. धाराशिव, 5) किशोर सोमनाथ नागटिळक, वय 29 वर्षे, रा. फकीरानगर वैराग रोड धाराशिव ता. जि. धाराशिव, 6)पठाण खाजा मोईन, वय 27 वर्षे, रा. हनुमान मंदीराजवह वजेगाव, 7) अक्षय राम माळी, वय 27 वर्षे, रा. विजय चौक धाराशिव, 8) सौरभ तानाजी निंबाहकर, वय 24 वर्षे,वैराग नाका धाराशिव, 9) सद्दाम मदार शेख, वय 29 वर्षे, रा. झोरी गल्ली धाराशिव हे 17.50 वा. सु. वैराग रोड लगतचे मागासर्वीय मुलांचे वस्तीगृह शेजारी पांढरीवस्ती कच्च्या रस्त्याच्या बाजूस साळुंके यांचे कोट्याजवळ पत्राचे शेडचे पाठीमागील बाजूस तिरट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 7,650 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मारहाण.”
कळंब पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1) किशोर शिवाजी चांदणे, 2)सोजरबाइ्र शिवाजी चांदणे, 3)अभिजीत बिभीषण क्षिरसागर, 4) विनायक मेटे, 5) रामहारी मोतीराम खंउागळे सर्व रा. लातुर ता.जि. लातुर, 6)शालनबाई तेलंगे रा. लिंगीपिंपळगाव ता. वाशी, जि. धाराशिव 7) शंकर प्रभाकर खंडागळे, 8)वर्षा शंकर खंडागळे दोघे रा. कल्पाननगर, कळंब ता. कळंब जि.धाराशिव यांनी दि.10.12.2023 रोजी 16.15 वा. सु. कल्पनानगर कळंब येथे फिर्यादी नामे-प्रभाकर शंकर खंडागळे, वय 81 वर्षे, रा. कल्पनानगर कळंब ता. कळंब. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून घरात घुसून मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगड मारहाण करुन जखमी केले. फिर्यादीचा मुलगा व नातु हे भांडण सोडवण्यास आले. असता त्यांनाही शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. व तुम्ही जर पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर तुमच्यावर विनयभंगाची खोटी केस दाखल करु अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- प्रभाकर खंडागळे यांनी दि.10.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 452, 324, 323, 427, 504, 506, 143, 147, 149 भा.दं.वि.सं. सह क. 24 सिनीअर सिटीझन ॲक्ट 2007 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)प्रभाकर महादा एरंडे, 2) लखन प्रभाकर एंरडे दोघे रा. कुन्हाळी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 07.12.2023 रोजी 12.00 वा. सु. वाणी हंद्राळ शिवारातील शेतात ता. उमरगा येथे फिर्यादी नामे-बालाजी प्रभाकर एरंडे, वय 32 वर्षे, रा. कुन्हाळी, ता.उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींन जनावराच्या गोठ्यासाठी ॲगल उभा करण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कुह्राडीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- बालाजी एरंडे यांनी दि.10.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 326, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1) उदयचंद प्रभाकर खंडागळे, 2) प्रभाकर खंडागळे,3) यश उदयचंद खंडागळे सर्व रा. कल्पनानगर, कळंब ता. कळंब जि. धाराशिव, यांनी दि. 10.12.2023 रोजी 16.15 वा. सु. कल्पनानगर कळंब येथे फिर्यादी नामे- किशोर शिवाजी चांदणे, वय 34 वर्षे, व फिर्यादीची आई रा. बौध्दनगर लातुर जि. लातुर यांना नमुद आरोपींनी बहिणीला भेटण्यासाठी गेल्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, विट, चाकुची मुठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- किशोर चांदणे यांनी दि.10.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)शाम दमलू आडे, 2) मिथुन शाम आडे, दोघे रा. भोसगा तांडा ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.10.12.2023 रोजी 14.00 वा. सु. भोसगा शिवारातील शेतात येथे फिर्यादी नामे-दगडू दमलू आडे, वय 52 वर्षे, रा. भोसगा ता. लोहारा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेतीच्या वादाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी कत्तीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- दगडू आडे यांनी दि.10.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 34 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
परंडा पोलीस ठाणे :आरोपी नामे- 5 ते 6 अनोळखी इसम यांनी दि.09.12.2023 रोजी 12.30 वा. सु. हरीदास साखाराम डुकरे यांचे शेतात देवळाली ता. भुम येथे फिर्यादी नामे-धनराज चत्रभुज खरसडे, वय 36 वर्षे, रा. मुंगेवाडी, ता. जामखेड जि.अहमदनगर यांना व त्यांचे सोबत असणारे उसतोड कामगार व फिर्यादीची पत्नी ताई धनराज खरसडे यांना नमुद अनोळखी आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून उसतोड करायची नाही जर उसतोडणी केली तर जिवे मारुन टाकु व तुमचे ट्रॅक्टर जाळुन टाकु अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- धनराज खरसडे यांनी दि.10.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे कलम 143, 147, 148, 149, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ फसवणूक.”
आंबी पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)चॉकलेटीबाई नवनाथ भोसले, 2) दिपाली नवनाथ भोसले व इतर 08 ते 10 अनोळखी पुरुष व महिला सर्व रा. ताकमोडवाडी, ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि. 07.12.2023 रोजी 12.30 वा. सु. ताकमोडवाडी येथे आरोपीचे राहाते घरासमोर फिर्यादी नामे- विजय प्रताप पाटील, वय 39 वर्षे, रा. अंतुली्र ब्रु. ता. पाचोरा, जि जळगाव यांचे पुतण्याचे लग्न आरोपी चॉकलेटीबाई यांच्या मुलीसोबत लावत असताना नमुद आरोपींनी रोख रक्कम एक लाख व तीन तोळे सोन्याचे दागिने असे एकुण 2,20,000₹ किंमतीचा ऐवज घेवून यातील फिर्यादी व त्यांचे नातेवाईक यांचे अंगावर मिरची पावडर टाकून फिर्यादी व फिर्यादीचे नातेवाईकांना फिर्यादीचे पुतण्याचे लग्नाचे अमिष दाखवुन विश्वासघात करुन फसवणुक करुन पळुन गेले. अशा मजकुराच्या फिर्यादी- विजय पाटील यांनी दि.10.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो. ठाणे येथे कलम 420, 406, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात