August 9, 2025

तालुका पत्रकार संघाचे मानाचे पुरस्कार जाहीर

  • कळंब – कळंब तालुका पत्रकार संघाची शहरातील पत्रकार भवन येथे बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध ठराव पारित करण्यात आले आहेत. तसेच दरवर्षी कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारासह सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कामाची दखल घेऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावेळी विश्वस्त सतीश टोणगे यांनी विविध सुचना सुचवल्या आहेत. पुरस्काराचे हे पंचवीसावे वर्ष आहे. लवकरच या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी दिली.
    स्व.शिवशंकर बप्पा घोंगडे पत्रकारिता पुरस्कार – अतुल कुलकर्णी (बीड), शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर राज्यस्तरीय पुरस्कार आफताब शेख (सोलापूर), स्व.गणेश घोगरे ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार – बालाजी अडसूळ (कळंब)
    स्वा. सै.स्व. शकुंतला देशपांडे समाज सेवा पुरस्कार – निलेश मोहिते यांच्या (स्नेह सावली फाउंडेशन बीड), रा. ई. काकडे शोध पत्रकारिता पुरस्कार – मुस्तान मिर्झा कळंब, स्व. सुधाकर सावळे साप्ताहिक पत्रकारिता पुरस्कार गिरीष जव्हेरी (धाराशिव) , स्व.के.ए.जोशी आदर्श शिक्षक पुरस्कार अब्दुल माजीद काझी तर ज्येष्ठ पत्रकार दैनिक लोकहित चे संपादक गणेश अण्णा शिंदे यांचा गुणगौरव पुरस्कार देवून विशेष सन्मान करण्यात येणार आहे.पुरस्कार पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी जाहीर केले.
    जानेवारीत होणाऱ्या कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.
error: Content is protected !!