कळंब – विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त कल्पनानगर येथे विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून,या पार्श्वभूमीवर लिंबुनी बौद्ध विहार येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सामाजिक कार्यकर्ते सतपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत जयंती उत्सवासाठी समितीची स्थापना करण्यात आली.यामध्ये अध्यक्षपदी अभिजीत जाधव, उपाध्यक्षपदी यश बनसोडे तर कोषाध्यक्षपदी अनिकेत कलवरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.यामध्ये वकृत्व, निबंध,सुंदर हस्ताक्षर,सामान्य ज्ञान,स्लो सायकल,धावणे, मुला-मुलींसाठी नृत्य स्पर्धा, संगीत खुर्ची,जोडी संगीत खुर्ची तसेच महिलांसाठी खास ‘पैठणचा खेळ’ यांचा समावेश आहे. या बैठकीस बाळासाहेब हौसलमल,मोतीचंद बागरेचा, राजा सय्यद,संदीप सोनवणे, राकेश जगताप,तुषार रणदिवे, दादा खंडागळे,अमित जाधव, विनोद जगताप,वैभव गायकवाड, बुवा वाघमारे,सौरभ गायकवाड, लाला कांबळे,दीपक गायकवाड, नितीन आंगरखे,अनिकेत गायकवाड आदींची उपस्थिती होती.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी