March 9, 2026

जि.प.शाळा तांदूळवाडी येथे महिला आरोग्य तपासणी शिबिर

  • कळंब – तालुक्यातील तांदूळवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदूळवाडी व मोहा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बोर्डा उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महिला व किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदूळवाडी येथे उत्साहात पार पडले.
    या शिबिरात गावातील महिला व किशोरवयीन मुलींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. शिबिरात रक्तगट, हिमोग्लोबिन,मधुमेह,रक्तदाब तसेच कॅन्सरसारख्या विविध आजारांची तपासणी करण्यात आली. यावेळी उपस्थित महिला व किशोरवयीन मुलींना आरोग्याचे महत्त्व, स्वच्छता तसेच स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक राहण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
    तसेच अंगणवाडी सेविकांकडून पूरक पोषण आहाराबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष स्टॉल लावण्यात आला होता. चौरस आहाराचे महत्त्व समजावून सांगत महिलांना योग्य आहार पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
    या कार्यक्रमासाठी मोहा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुमित मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बोर्डा उपकेंद्राचे आरोग्य सेवक संतोष फलफले व रोहिणी शिंदे यांनी सेवा दिली. तसेच गावातील अंगणवाडी कार्यकर्त्या मंदाताई खोसे,सुरेखा काळे,अनुराधा भोसले,यास्मिन शेख,अनिता काळे तसेच मदतनीस सागरबाई लिमकर व शिल्पा माने यांनी सहकार्य केले.
    हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संतोष भोजने यांनी पुढाकार घेतला.उपक्रमशील शिक्षिका आशा पवार,रसिका आगरकर,संतोष मोहिते,सयाजी शिंदे तसेच मध्यान्ह भोजन कर्मचारी रुक्मिणी डिकले,मयुरी डिकले व धनश्री डिकले यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!