March 1, 2026

एनएमएमएस परीक्षेत विद्याभवन हायस्कूल कळंबचे ४४ विद्यार्थी उत्तीर्ण,८ जणांचे शतकी यश

    • कळंब – राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत विद्याभवन हायस्कूल कळंब च्या विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश संपादन करत शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे.
      ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने आणि मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे घवघवीत यश मिळवले.
      या परीक्षेत प्रशालेतील एकूण ४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी ८ विद्यार्थ्यांनी शंभरच्या पुढे गुण मिळवत विशेष कामगिरी केली आहे.समीक्षा रीतपुरे हिने १३८ गुण मिळवत प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशामुळे शाळेचा नावलौकिक अधिक उंचावला आहे.
      यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अक्षरा इखे, संदेश पवार,शिवक्रांती गायकवाड,शिवप्रसाद शिंदे, ओंकार गुजर,प्राची शिरसाट, प्रगती सावंत,वैष्णवी तांबारे, गजानन पाटील,समर्थ लांडगे, समर्थ शिंदे,समर्थ मोराळे,समृद्धी शिंदे,संस्कार थोरबोले,वर्षा भारती,हर्षवर्धन काळे,कार्तिकी कापसे, यश हारकर, आदिती गव्हाणे, आदिती इंगळे, चैतन्य पारखे, श्रेयश डोईफोडे, श्रुती खूने, सिद्धी कवडे, सिद्धी वाघमारे, रिया झरकर, आकांक्षा नखाते, आकांक्षा शिरसाट, ओंकार पाटसकर, अमृता सावंत, प्रगती गायकवाड, प्रणाली वायबसे, प्रवीण बिक्कड, प्रिया गायकवाड, अर्णव पाटील, अर्पिता गायकवाड, कृतिका तरकसे, द्रुव कोठावळे, तुषार कांबळे, स्वानंदी जाधव, स्वराली वाघमारे, आयुष गायकवाड व सई नखाते आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
      गुणवंत विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापक कुंभार व्ही. जी.,उपमुख्याध्यापक मयाचारी व्ही. एस. व पर्यवेक्षक कोळी जे. एन. यांच्या हस्ते पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक डी. बी. पवार, गाढवे मॅडम, सुनिता येळे, रवी कोल्हे व आप्पासाहेब वाघमोडे यांचाही विशेष गौरव करण्यात आला. उपस्थित पालकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
      संस्थेचे अध्यक्ष अनिल मोहेकर व सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोपान पवार यांनी केले.

</ul

error: Content is protected !!