August 9, 2025

पालकमंत्री ना.तानाजीराव सावंत यांच्या पुढाकाराने कळंब येथील संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामी मठाचे नागरी तिर्थस्थळामध्ये समावेश

  • कळंब – शहर हे संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामी यांची जन्मभूमी आहे.आजोळी नेकनूर येथे जन्म झालेले श्री मन्मथ स्वामी हे मुळचे कळंबचे व येथूनच त्यांनी आपले दिव्य प्रबोधन कार्य आरंभ केले. या पार्श्वभूमीवर कळंब येथील संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामी मठाला नागरी तिर्थक्षेत्र म्हणून मान्यता मिळावी म्हणून येथील भक्तांची व नागरीकांची अत्यंत जूनी मागणी होती. परंतु शासन व प्रशासन स्तरावर याबाबत औदासिन्य होते. परंतु दि.९ ऑगस्ट २०२३ रोजी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री व धाराशिव जिल्हा पालकमंत्री ना.तानाजीराव सावंत यांनी या मठास भेट देऊन आरती केली. यावेळी त्यांना या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ मुंडे, लिंगायत संघर्ष समीतीचे अध्यक्ष सागर मुंडे, माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा, शिशीर राजमाने, नाना थळकरी, निलेश होनराव आशोकं चींचकर ,शिवराज होनराव इत्यादी लोकांनी चर्चा करताना येथील नागरीकांच्या मागणीकडे लक्ष वेधले. त्यावर या मंदिरास तात्काळ तिर्थक्षेत्र दर्जा दिला जाईल, व त्यानंतर लगोलग निधी देऊन तिर्थक्षेत्राचा विकास करण्यात येईल असा शब्द ना. तानाजीराव सावंत यांनी दिला होता.
    या आश्वासनानंतर जिल्हा नियोजन समिती ची पहिली बैठक दिनांक १६ आक्टोबर २०२३ रोजी पालकमंत्री ना. तानाजीराव सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. दिलेल्या शब्दाला न्याय देण्याचा स्वभाव असणा-या पालकमंत्री ना. तानाजीराव सावंत यांनी याच बैठकीत संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामी मठाचा नागरी तिर्थस्थळामध्ये समावेश करणारा ठराव एकमताने मंजूर करवून घेतला.
    या निर्णयामुळे मन्मथ स्वामी भक्तगणात व नागरिकांत अत्यंत आनंद व समाधान व्यक्त होत असून जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री ना. तानाजीराव सावंत व जिल्हा नियोजन समिती चे सचीव जिल्हाधिकारी डॉ.सचीन ओंबासे यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.
error: Content is protected !!