August 9, 2025

संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची 399 वी जयंती उत्साहात साजरी

  • कळंब – तेली समाज सेवाभावी संघाच्या वतीने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची 399 वी जयंती मोठ्या उत्साहात संत शिरोमणी मन्मथ स्वामी मठ येथे ८ डिसेंबर रोजी साजरी करण्यात आली. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज हे संत तुकाराम महाराज यांच्या १४ प्रमुख टाळकऱ्यांपैकी एक होते. संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे लेखन केले व स्वतः ही विपुल अभंग रचना केली आहे त्यांनी प्रांतभेद ,जातीभेद या पलीकडे त्यांनी तैलसिंधू, शंकर दीपिका यांसारखेअनेक ग्रंथ लिहिले. जयंतीच्या निमित्त आयोजित कार्यक्रमाची सुरुवात संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेंद्रजी मुंडे,माजी उपनगराध्यक्ष पांडुरंग कुंभार, संजय मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमात ज्येष्ठ विधीज्ञ त्रिंबक मनगीरे, महादेव महाराज अडसूळ, डॉ. सुनील थळकरी, विधीज्ञ मंगेश अष्टेकर ,प्रकाश भडंगे, ज्येष्ठ पत्रकार माधवसिंह राजपूत, मार्गदर्शक लक्ष्मण फल्ले, विश्वंभर किरवे, महारुद्र कानडे, सागर भडंगे, बाळकृष्ण गुरसाळे, कैलास बागल, गणेश शेवते ,अभिषेक मुंडे, बाबू चाऊस ,शिवकुमार राजमाने ,नाना थळकरी ,शैलेश स्वामी, संतोष भोजने, दीपक जाधव ,पांडुरंग लोकरे, बाप्पा कोरे ,निलेश पांचाळ, सचिन डोरले, बालाजी पांचाळ, नाना शिंगणापूरे, मच्छिंद्र साखरे ,सचिन भडंगे,बबन फल्ले ,राम उटीकर ,गोरख फल्ले, संभाजी किरवे, यांनी सहभाग घेतला पाहुण्याचे स्वागत व सूत्रसंचालन तेली समाज सेवाभावी संघाचे शहराध्यक्ष अशोक चिंचकर यांनी तर आभार निलेश होनराव यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तेली समाज सेवाभावी संघाचे तालुकाध्यक्ष सचिन देशमाने,दत्ता शेवडे,गणेश शेवते, अशोक चिंचकर,मनोज फल्ले, अशोक फल्ले,बालाजी देशमाने,विशाल फल्ले ,उत्तरेश्वर देशमाने, गजानन मुंडे ,गजानन शिंगणापूरे यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!