कळंब – धाराशिव जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी नुकतेच रुजू झालेले डॉ.रवींद्र खंदारे यांचे राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघ,महाराष्ट्र यांच्या वतीने स्वागत करून त्यांना दिनदर्शिका भेट देण्यात आली. उपक्रमशील,उच्चविद्याविभूषित व डॉक्टरेट प्राप्त शिक्षणाधिकारी धाराशिव जिल्ह्याला लाभल्याबद्दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.त्यांच्या नेतृत्वामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावेल,असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला. जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्न प्रलंबित असून केंद्रप्रमुख,विस्तार अधिकारी,मुख्याध्यापक व पदवीधर पदोन्नती यांसारखे जिव्हाळ्याचे विषय तसेच विद्यार्थ्यांच्या समाजकल्याण शिष्यवृत्ती योजनांबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने प्रभावी पावले उचलावीत,अशी अपेक्षा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.कौशल्यपूर्ण नेतृत्वातून सकारात्मक बदल घडवून आणावेत,असेही पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. यावेळी राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघाच्या वतीने प्रकाशित दिनदर्शिका डॉ.खंदारे यांना भेट देण्यात आली. या दिनदर्शिकेचे वैशिष्ट्य म्हणजे महाज्योती मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांची सविस्तर माहिती त्यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. कार्यक्रमास राज्य सरचिटणीस संतोष भोजने,उपाध्यक्ष सुखदेव भालेकर,जिल्हाध्यक्ष अनंत फुलसुंदर,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पंकज कासार,विशाल जाधव, कल्याण कुंभार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. हा स्वागत सोहळा उत्साहात व सकारात्मक वातावरणात पार पडला.
More Stories
धाराशिव येथे शिवजयंतीनिमित्त दोन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव
‘माय भारत’ मेगा पदयात्रेतून शिवजयंतीचा जागर
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना जाणून सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी