इयत्ता ९ वीतील दोन विद्यार्थी पुढील Viva साठी पात्र; गुणवंतांचा सत्कार सोहळा उत्साहात
कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभवन हायस्कूल,कळंब येथील इयत्ता ९ वीतील विद्यार्थ्यांनी होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा २०२५–२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इ.९ वी ‘अ’ मधील कु.शाश्वती सतीश मडके व इ.९ वी ‘क’ मधील कु.उदय हरीश काळे या दोन्ही विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेत उत्तीर्ण होत पुढील Viva परीक्षेसाठी पात्रता मिळवली आहे.त्यांच्या या यशामुळे प्रशालेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रशालेच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थापक अध्यक्ष,शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या हस्ते कु.शाश्वती सतीश मडके व कु.उदय हरीश काळे यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या दोन्ही विद्यार्थ्यांना सहाय्यक शिक्षक सुरज मडके,सहाय्यक शिक्षक विनोद सागर, व सहाय्यक शिक्षिका रेखा तीर्थकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.त्यांच्या परिश्रमाचेही यावेळी विशेष कौतुक करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्याध्यापक विक्रम मयाचारी,पर्यवेक्षिका जगदेवी कोळी तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते. विद्याभवन हायस्कूलच्या या यशामुळे कळंब तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात संस्थेचा मान उंचावला असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा ठसा पुन्हा एकदा उमटला आहे.
More Stories
माजी प्राचार्य संजय भोसले यांना ‘संस्थामाता सुमनताई मोहेकर’विशेषांक सप्रेम भेट
हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा रुग्णालयात जागतिक युनानी दिवस उत्साहात
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना कृतज्ञ अभिवादन