गोविंदपूर – कळंब तालुक्यातील देवधानोरा येथील गजानन विद्यालयात दिनांक १६ जानेवारी २०२६ शुक्रवार रोजी शाळेत बाल आनंदमेळा आयोजित केला होता.विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची रेलचेल होती.पुरीभाजी,पावभाजी वडापाव,पुलाव,इडली सांबर,बालुशाही,पॅटीस,समोसा इत्यादी पदार्थांचे स्टॉल तसेच चहा कॉफी चे स्टॉल लावले होते. विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारिक व व्यापारिक दृष्टीकोन विकसित व्हावा तसेच खरी कमाई, नफा तोटा यांचे ज्ञान आत्मसात व्हावा हा या आनंदमेळ्याचा उद्देश होता. या आनंदमेळ्यासाठी पालक तसेच नागरिक यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक श्री अप्पासाहेब बोंदर,श्री ज्ञान प्रबोधन मंडळाचे सचिव बलभीम बोंदर तसेच घोगरे,श्रीमती जाधवर,बालाजी बोंदर,क्षीरसागर, चंद्रकांत बोंदर, वटाणे, वाघमारे बप्पा, काळे व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी