कळंब — बोधिसत्व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या ३२ व्या वर्धापन दिनानिमित्त कळंब शहरात अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.यावेळी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामुदायिक त्रिशरण व पंचशील ग्रहण करण्यात आले. तसेच नामांतर लढ्यातील शहीद भीमसैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमास माजी नगरसेवक सुनील गायकवाड,रिपाई नेते शिवाजी शिरसाठ,राजाभाऊ गायकवाड,सचिन गायकवाड, कैलास जावळे,भाऊसाहेब कुचेकर,निवृत्ती हौसलमल, दिलीप गायकवाड,सुमित रणदिवे, शीलवंत बप्पा,साहित्यिक रमेश जगताप,मिलिंद गायकवाड, तरकसे,धावारे आदी मान्यवर उपस्थित होते.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी