कळंब– शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहा साजरी करण्यात आली. विद्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पालखीचे पूजन संस्थेचे सचिव ॲड.चत्रभुज नारायण भवर,उपाध्यक्ष डॉ.पांडुरंग नारायण भवर,मुख्याध्यापक तथा प्राचार्य काकासाहेब मुंडे,उपप्राचार्य डॉ. मीनाक्षी शिंदे,उपमुख्याध्यापक सोमनाथ सावंत,पर्यवेक्षक शंकर गोंदकर यांच्या हस्ते करण्यात आले. व शहराच्या मुख्य रस्त्यावरून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली सदरील मिरवणुकीत घोड्यावर बसलेले वेशभूषा येथील विद्यार्थी,लेझीम पथक,टिपरी पथक,वारकरी वेशभूषेतील पथक यांनी शहरातील नागरिकांचे मने जिंकली.सदरील मिरवणुकीची सांगता विद्यालयात करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य काकासाहेब मुंडे हे होते.विद्यालयामध्ये नूतन नगराध्यक्ष सुनंदाताई शिवाजी कापसे व निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सर्व महिला नगरसेविका यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर विद्यालयातील सर्व महिला शिक्षिका यांचा मान्यवराच्या हस्ते सन्मान करण्यात आला.त्याचबरोबर पोलीस ठाणे कळंबच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभा पुडगे, विद्यालयाची माजी विद्यार्थिनी प्रतीक्षा गायकवाड हिचे वनरक्षक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.विद्यालयाचा माजी विद्यार्थी संजय चिंचकर युवा उद्योजक यांचाही सन्मान करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हनुमंत सौदागर प्राचार्य भाऊसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालय केज हे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य देवानंद साखरे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक सोमनाथ सावंत यांनी केले, सूत्रसंचालन परमेश्वर मोरे, जीवनसिंह ठाकूर तर आभार प्रदर्शन संगीता कदम यांनी मानले यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन