कळंब – क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दिनांक ३ जानेवारी रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव (ता.खंडाळा) येथे होणाऱ्या भव्य प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी राज्यभरातून फुलेप्रेमी समाज एकत्र येत असून धाराशिव जिल्ह्यातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माळी विकास मिशन धाराशिव तर्फे करण्यात आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. मागील वर्षी ३ जानेवारीला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत राज्य शासनाने नायगाव येथे सावित्रीमाईंचे भव्य स्मारक, प्रशिक्षण संस्था व विविध सुविधा उभारण्यासाठी तब्बल १५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन ३ जानेवारी रोजी होणार आहे. महात्मा फुले यांचे मूळ गाव कटगुण ते सावित्रीमाईंची जन्मभूमी नायगाव या दरम्यान १०० किमी क्रांतीज्योती अभिवादन समता रॅली आयोजित करण्यात आली असून शनिवारी सकाळी ७ वाजता कटगुण येथून रॅलीला सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमासाठी धाराशिव जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा समन्वयक जोतिराम कोरे,मनोज माळी, प्रकाश गोरे,सावता माळी, बालाजी गोरे,संतोष चौगुळे, तानाजी माळी,दत्ता तोडकर, बाळासाहेब वाडकर,सुधीर गोरे, अविनाश माळी,नाना माळी, बाळासाहेब माळी,नानासाहेब खडबडे,प्रताप यादव,बबन फुलसुंदर,विकास माळी,मारुती रोकडे,दिलीप मेहेत्रे,रणजित गवळी,प्रकाश माळी,शिवाजी येवारे,रवि गोरे,राजकुमार माळी यांनी केले आहे.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन