गोविंदपूर (अविनाश सावंत) – प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री संत भगवान बाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त गोविंदपूर येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिर परिसरात भव्य दिव्यअखंड हरिनाम सप्ताह व ग्रथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा दि.२८ डिसेबर ते ४ जानेवारी २०२६ दरम्यान होत आहे. या सप्ताहात दररोज सकाळी ४ ते ६ काकडा भजन,७ ते ९ ज्ञानेश्वरी पारायण,११ ते १ गाथा भजन,सायंकाळी६वाजता हरिपाठ,तसेच रात्री ९ वाजता कीर्तन सोहळा होईल.त्यानंतर ११ ते ४ हरिजागर होईल.२८ डिसेंबर २०२५ रविवार रोजी समस्थ ग्रामस्थांच्या हस्ते कलश पूजन करून सप्ताहास प्रारंभ झाला.हभप केशव माहाराज सावंत हे दररोज ज्ञानेश्वरी पारायण करतील. दि.२८ डिसेंबर रविवार रोजी हभप उध्दव महाराज चोले यांचे कीर्तन होणार आहे.तर दि.२९ डिसेंबर सोमवार रोजी हभप संतोष महाराज वनवे यांचे,दि.३०डिसेंबर मंगळवार रोजी हभप केशव भगत महाराज शास्त्री(भगवानगड),दि.३१डिसेंबर बुधवार रोजी विष्णु महाराज पाथर्डीकर,दि.१जानेवारी गुरुवार रोजी हभप आदिनाथ महाराज लाड(आळंदी),२जानेवारी शुक्रवार रोजी हभप भरत महाराज जोगी तर३जानेवारी शनिवार हभप आण्णासाहेब बोधले महाराज(डिकसळ ) यांची किर्तन सेवा होणार आहे तर रविवारी ४ जानेवारी रोजी सकाळी ८ ते १० वाजता ग्रथराज ज्ञानेश्वरी व भगवानबाबा यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य नगर प्रदक्षिणा होईल व नंतर ११ वाजता हभप केशव महाराज घुले शास्त्री यांचे आमृततुल्य काल्याचे कीर्तन होणार आहे.व नंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे.तरी या सप्ताहास भाविकांनी उपस्थित राहावे,असे आवाहन समस्त गोविंदपूर ग्रामस्थांनी केले आहे. या सप्ताहासाठी संत कोकणे बुवा वारकरी शिक्षण संस्था दारफळ देवाच येथील विद्यार्थी आठही दिवस हजर राहतील.
More Stories
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
हुंडा प्रतिबंध व कौटुंबिक हिंसाचार जनजागृती काळाची गरज- ॲड.प्रियंका जाधव
कळंब–ढोकी परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार