रा. जहागीरदारवाडी तांडा ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी सांड पाणी जागेत सोडण्याचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने जखमी करुन जखमी केले. जिवे मारण्याचा धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शिवाजी जाधव यांनी दि.18.12.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे धाराशिव ग्रामीण येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2), 352, 351(2), (3), 189(2), 191(2), 190 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग पोलीस ठाणे :आरोपी नामे-मुज्जमील अहमद कुरेशी, विजामौद्दीन हकीम कुरेशी, सईद अहमद कुरेशी, शफिक गुलाम समदानी बाडेवाले, मुख्तदीर गुलाम बाडेवाल सर्व रा. नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.14.12.2025 रोजी 18.15 वा. सु. ते दि.14.12.2025 रोजी 18.30 वा. सु. हकीम कुरेशी यांचे घराजवळील सार्वजनिक रोडवर नळदुर्ग येथे फिर्यादी नामे-अब्दुल अलीम सत्ता शेख, वय 42 वर्षे, रा. रहीम नगर नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मस्जीद मध्ये हस्त क्षेप करण्याचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड, लाकडी काठी, हातातील पंचाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याच्या धमकी दिली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अब्दुल अलीम शेख यांनी दि.18.12.2025रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरुन पो ठाणे नळदुर्ग येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2), 126(2),352, 351(2), 189, 189(2), 191(2)(3), 190 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“रस्ता अपघात.”
तुळजापूर पोलीस ठाणे :आरोपी नामे-अब्बास चाँद खुटेपट, रा. लोहारा ता. लोहारा जि. धाराशिव व सोबत मयत नामे-रिजवाना खय्युम शेख, वय 35 वर्षे, रा. मार्डी ता. लोहारा जि. धाराशिव हे दि.30.11.2025 रोजी 14.00 वा. सु.मोटरसायकल वरुन जात होते. दरम्यान तुळजापूर बायपासने पुढे नळदुर्ग रोडला वळत असताना आरोपी नामे- अब्बास चाँद खुटेपट यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल हा हायगयी व निष्काळजीपणे चालवून मोटरसायकल स्लीप झाल्याने रिजावाना शेख या मोटरसायकलवरुन पडून गंभीर जखमी होवून उपचार दरम्यान मयत झाल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-खय्युम करीम शेख, वय 40 वर्षे, रा. मार्डी ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.18.12.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125(ए), 125(बी), 106 सह 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
येरमाळा पोलीस ठाणे:मयत नामे-सुभेच्छा संजय खंडागळे, वय 17 वर्षे, रा. हळदगाव ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.22.10.2025 रोजी 07.30 ते 09.15 वा. राहते घरातील पत्राचे लोखंडी आडुस गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे-रोहीत सुरेश भोसले, रा. रामवाडी ता. जि. धाराशिव यांनी मयत सुभेच्छा हिस वारंवार फोन केल्या मुळे व शिवीगाळ करत असल्याचे त्रासाला कंटाळुन मयत सुभेच्छा यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-वैशाली संजय खंडागळे, वय 40 वर्षे, रा. हळदगाव ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.18.12.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-107, 78, 79 सह कलम 12 पोक्सो ॲक्ट अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान