९ विद्यार्थी यशस्वी,शिवम डोरलेची दुसऱ्या फेरीत झेप
डिकसळ – मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रतिष्ठित डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत डिकसळ येथील श्री संत बोधले महाराज प्राथमिक शाळेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेतील नऊ विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेत उत्तीर्ण होत शाळेच्या गुणवत्तेचा आलेख उंचावला असून,शिवम अविनाश डोरले याची दुसऱ्या फेरीसाठी निवड झाल्याने शाळेच्या यशात भर पडली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये शिवम अविनाश डोरले,शुभ्रा नवनाथ अंबिरकर,संध्या माणिक गायकवाड,शिवम सतीश चिंचकर, क्रांती सोनाजी वनकळस,शुभ्रा गणेश बोराडे,जान्हवी महेंद्र आवटे, ओंकार श्रीकांत भांडे आणि यश दत्तात्रय हिरे यांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन,तर्कशक्ती आणि प्रयोगशीलतेची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने घेतली जाणारी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते.अशा स्पर्धेत ग्रामीण विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे. या यशाबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी बांधकाम सभापती सूर्यकांत टेकाळे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शाळेच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सचिन डोरले,भागवत वाघमारे, समीर पटेल,अनंत बोधले,श्रीकांत भांडे, भगवान वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. सत्कारप्रसंगी मुख्याध्यापक पोपट निकम,सहशिक्षक प्रदीप यादव, सज्जन बर्डे,किशोर वाघमारे,रमेश अंबिरकर,नामदेव झाडे,सूरज राऊत तसेच शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे पालक व शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन