कळंब – संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०१ व्या जयंतीनिमित्त कळंब उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच तहसील कार्यालयात आदरपूर्वक अभिवादन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी नायब तहसीलदार गोपाळ तापडिया,नायब तहसीलदार गोकुळ भराडिया,श्रीमती किरण फुले,तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते. तहसील कार्यालयात झालेल्या स्वतंत्र कार्यक्रमात संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन नायब तहसीलदार गोपाळ तापडिया, नायब तहसीलदार पंडित जाधव, श्रीमती शिल्पा माळवे, पवार आर.डी.,श्रीमती कदम एस.एस.,श्रीमती सोनवणे एस.एस.,श्रीमती रणदिवे व्ही.के. यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. कार्यक्रमास तेली समाज सेवा भावी संघ,कळंब चे माजी शहराध्यक्ष अशोक चिंचकर तसेच कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून संताजी महाराजांना अभिवादन केले. संताजी महाराजांच्या सामाजिक न्याय,समता आणि कर्मयोगी संदेशाचे स्मरण करून कार्यक्रमाची सांगता झाली.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी