कळंब – ठाणे येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय रग्बी स्पर्धेमध्ये ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे अध्यक्ष अनिल मोहेकर व सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब येथील विद्याभवन हायस्कूलच्या मुलींनी उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केल्याने दोन विद्यार्थिनींची महाराष्ट्राच्या राज्य संघामध्ये निवड झाली आहे.याबद्दल शाळेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. ठाणे येथे झालेल्या राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेत विद्याभवन हायस्कूलच्या विद्यार्थिनी शिवक्रांती अतुल गायकवाड व अमृता शाहू सावंत या दोन खेळाडूंनी निवड चाचणी मध्ये आपल्या कौशल्याची व खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केल्याने त्यांची महाराष्ट्र राज्य संघामध्ये निवड करण्यात आली आहे.यानंतर होणाऱ्या राष्ट्रीय शालेय रग्बी स्पर्धेमध्ये या दोन विद्यार्थिनी महाराष्ट्र राज्य संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत या यशाबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.महाराष्ट्रा संघात निवड तर झालेलीच आहे परंतु येणाऱ्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी दाखवत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करावे यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.यशस्वी खेळाडूंचे पालक अतुल गायकवाड,शाहू सावंत, शैलेश शिंदे यांचा देखील सत्कार करण्यात आला.या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा विभाग प्रमुख संजय मडके, राजाभाऊ शिंदे,निलेश माळी यांचा देखील सत्कार करण्यात आला. या सत्कार कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक कुंभार व्ही. जी. उपमुख्याध्यापक मयाचारी व्ही.एस. पर्यवेक्षक कोळी जे.एन. यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काळे बी. एन.यांनी केले.
More Stories
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
हुंडा प्रतिबंध व कौटुंबिक हिंसाचार जनजागृती काळाची गरज- ॲड.प्रियंका जाधव
कळंब–ढोकी परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार