February 8, 2026

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.19 नोव्हेंबर रोजी मोटार वाहन कायदा-नियम भंग प्रकरणी एकुण 237 कारवाया करुन 2,08,950 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • उमरगा पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.19.11.2025 रोजी 09.30 वा. सु. उमरगा पो ठाणे ग्रामीण प्रशाळेजवळ मोकळ्या जागेत माउज येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-सपना राजु मस्के, वय 36 वर्षे, रा. कुंभार पट्टी उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे 09.30 वा. सु. ग्रामीण प्रशाळेजवळ मोकळ्या जागेत माडज येथे पप्पु प्लेईंग मटका जुगाराचे साहित्या एकुण 890 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम-12 (अ) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • आंबी पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान आंबी पोलीसांनी दि.19.11.2025 रोजी 16.15 वा. सु. आंबी पो ठाणे हद्दीत कार्ला येथील समाज मंदीराच्या पाठीमागे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-रावसाहेब मोतीराम गटकळ, वय 50 वर्षे, सागर रामदास शिंदे, वय 35 वर्षे, भाउसाहेब अधिक राव झिरपे, वय 55 वर्षे, भारत सुदाम पवार, वय 32 वर्षे, हनुमंत श्रीहरी शिंदे, वय 45 वर्षे, भैरवनाथ देविदास धाराणकर वय 34 वर्षे, रा.कार्ला ता. परंडा जि. धाराशिव हे 16.15 वा. सु. कार्ला येथील समाज मंदीराच्या पाठीमागे तिरट मटका जुगाराचे साहित्या एकुण 2,220 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आंबी पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम-12 (अ) अन्वये आंबी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • नळदुर्ग पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान नळदुर्ग पोलीसांनी दि.19.11.2025 रोजी 14.30 वा. सु. नळदुर्ग पो ठाणे हद्दीत जळकोट विजय जनरल स्टोअर्सचे बाजूला आडोशास छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-बालाजी प्रकाश गंगणे, वय 38 वर्षे, रा. जळकोट ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 14.30 वा. सु. जळकोट विजय जनरल स्टोअर्सचे बाजूला आडोशास मिलन डे मटका जुगाराचे साहित्या एकुण 7,605 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले नळदुर्ग पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम-12 (अ) अन्वये नळदुर्ग पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे नोंद.”
  • परंडा पोलीस ठाणे: आरेापी नामे-लक्ष्मण रामदास थिटे, वय 41 वर्षे, रा. खानापूर ता. परंडा जि. धाराशिव,महादेव सौदागर आडेकर, वय 55 वर्षे, रा. साडे ता. करमाळा जि. सोलापूर यांनी दि.19.11.2025 रोजी 14.10 ते 14.50 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे चार चाकी गाडी क्र एमएच 14 सीपी1891 व चारचाकी गाडी क्र एमएच 45 एएफ 8712 हे आयसीआयसी आय बॅकेचे समोर परंडा बार्शी रोडवर परंडा येथेचौघरी शक्ती स्टिल दुकानासमोर परंडा रोडवर परंडा येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना परंडा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285 मोवाका अन्वये परंडा पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
  • भुम पोलीस ठाणे: आरेापी नामे-रोहीत समाधान वीर, वय 22 वर्षे, रा. इंदीरानगर भुम ता. भुम. जि. धाराशिव, इम्रान मेहबुब बेग मोगल, वय 37 वर्षे, रा. मोगलवाडा भुम ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.19.11.2025 रोजी 11.00 ते 20.00 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे पे रिक्षा क्र एमएच 25एके 2618, स्विफट क्र एमएच 13 इके2785 व सुझुकी इको गाडी क्र एमएच 25 बीए 6586 हे गोलाई चौक भुम व फलोरा चौक भुम येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना भुम पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285 मोवाका अन्वये भुम पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
  • लोहारा पोलीस ठाणे: आरेापी नामे-हमीद अल्लाबक्ष फकीर, वय 32 वर्षे, रा. लोहारा ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.19.11.2025 रोजी 12.15 वा. सु. आपल्या ताब्यातील छोटा हत्ती क्र एमएच 24 जे 9665 हा श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक कडे जाणारे रोडवर हायस्कुल समोर लोहारा येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना लोहारा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285 मोवाका अन्वये लोहारा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • उमरगा पोलीस ठाणे: आरेापी नामे-प्रभाकर अंबादास जगताप, वय 38 वर्षे, रा. तुरोरी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.19.11.2025 रोजी 12.45 वा. सु. आपल्या ताब्यातील टाटा मॅझीक चार चाकी क्र एमएच 25 आर 6546 हा पोलीस स्टेशन डिवायडरच्या दक्षिण बाजूस मेन रोडवर उमरगा येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना उमरगा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285 मोवाका अन्वये उमरगा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल.”
  • परंडा पोलीस ठाणे : सार्वजनिक रस्त्याकडेला हातगाड्यावरील शेगडीवर निष्काळजीपने अग्नि प्रज्वलीत कणाऱ्यांवर परंडा पोलीसांनी दि. 19 नोव्हेंबर रोजी 4 कारवाया केल्या. यात ईडा ता. भुम येथील ग्रामस्थ- विनायक बाबुराव खैरे,वय 45 वर्षे, साहील पापाराव शेख, वय 20 वर्षे, दत्तात्रय हरिदास कानगुडे, वय 44 वर्षे, अमोल श्रीहरी भोरे, वय 30 वर्षे, यांनी ईडा साखर कारखान्या जवळ रोडचे डावे बाजूस रस्त्याकडेला आपापल्या हातगाड्यावरील शेगडीवर निष्काळजीपने अग्नि प्रज्वलीत करुन पदार्थ तयार करत असताना परंडा पोलीसांना मिळून आले.यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरध्द भा.न्या.सं. कलम- 287 अन्वये परंडा पो.ठा. येथे स्वतंत्र 4 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
  • “अवैध गुटखा विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
  • आनंदनगर पोलीस ठाणे :आरोपी नामे-सलीम युनुस शेख, वय 40 वर्षे, रा. मिल्ली कॉलनी धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.19.11.2025 रोजी 11.30 वा. सु.कोहीनुर हॉटेलकडे जाणारे रोडवर महाराष्ट्रात शासनाचे प्रतिबंधीत केलेला गुटखा व तत्सव पदार्थ सुहाना केसर गुटखा,प्रिमियम झेड एन -1,जाफरानी जर्दा, बाजीराव फलेवरेड पान मसाला पाउच, रॉयल 220 तंबाखु, मस्तानी प्रिमियम चेविंग टोबॅको असा एकुण 6,255 ₹ किंमतीचे विक्री करीता जवळ बाळगलेला आनंदनगर पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी गुटखा साहित्यासह जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.न्या.सं. कलम- 223, 274, 275 अन्वये आनंदनगर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • भुम पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-राधेश्याम फुलेंद्र सरोज, वय 45 वर्षे, रा. 233 चिरकोट ता. लालगंज जि. आगड, राज्य उत्तरप्रदेश ह.मु. यादव नगर भोईसर पालघर व सोबत त्यांचे मिश्र बहादुर व अखिलेख हे दि.12.11.2025 रोजी 22.30 ते दि.18.11.2025 रोजी 17.30 वा. सु. आरोपी नामे- बाळासाहेब पवार, शोभा गणेश काळे, काजल व चिवाबाई अतुल काळे सर्व रा. भुम यांचे घरी सोने खरेदी करीता गेले असता नमुद आरोपीने पैसे घेवून आलात का असे विचारले असता फिर्यादीने सांगितले की, आम्ही सध्या पैसे आणले नाही असे सागिंतले असता नमुद आरोपीने चाकुचा धाक दाखवून फिर्यादी व त्यांचे मित्र यांचे खिशातील दोन मोबाईल फोन रोख रक्कम 1500 ₹ जबरीने चोरुन घेतले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-राधेश्याम सरोज यांनी दि.19.11.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 309(6) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-अभिजीत पांडुरंग बोधनले, वय 38 वर्षे, रा.बालाजी नगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 20,000₹ किंमतीची हिरो कंपनीची मोटरसायकल स्प्लेंडर ही दि.09.11.2025 रोजी 23.30 ते दि.10.11.2025 रोजी 06.30 वा. सु. अभिजीत बोधनले यांचे राहते घरासमोर अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अभिजीत बोधनले यांनी दि.19.11.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला.
  • तुळजापूर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-फुलावती शंकर राठोड, वय 55 वर्षे, रा. श्रीनाथमंगल कार्यालय जवळ नळदुर्ग रोड तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव या दि.18.11.2025 रोजी 15.00 वा. सु. जुने बसस्थानक तुळजापूर येथे बस मधून उतरत असताना अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून फुलावती राठोड यांचे गळ्यातील सोन्याचे 28 ग्रॅमचे गंठण अंदाजे 1,40,000₹ किंमतीचे चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-फुलावती राठोड यांनी दि.19.11.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “मारहरण.”
  • परंडा पोलीस ठाणे :आरोपी नामे-केदार जाधव, रा. सिरसाव वाकडी ता. परंडा जि. धाराशिव इतर दहा इसम यांनी दि.01.11.2025 रोजी 22.30 वा. सु. सिरसाव वाकडी येथे फिर्यादी नामे- शाम प्रल्हाद चव्हाण, वय 36 वर्षे, रा. सवतगाव ता. माळशिरस जि. सोलापूर ह.मु. नवजीवत हॉस्पीटल अकलुज ता. माळशिरस जि. सोलापूर यांना गैरकायद्याची मंडळी जमवून नातेवाईकांमध्ये मयत मुलीचा चेहरा पाहण्याच्या कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. फिर्यादीचे मामाचा मुलगा मेघराज पवार यास काठीने मारहाण केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शाम चव्हाण यांनी दि.19.11.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे परंडा येथे भा.न्या.सं.कलम 118(1),115(2), 352, 351(2), 189(2), 191(2), 191(3), 190 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “रस्ता अपघात.”
  • नळदुर्ग पोलीस ठाणे मयत नामे- लक्ष्मण भुपाल शिंदे, वय 47 वर्षे, रा. खुदावाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.12.11.2025 रोजी 20.00 वा. सु. नरवडे तांडा रोडवर अनंत गोविंदराव नरवडे यांचे शेताचे जवाळील शेत रस्त्याचे वळणावरुन पायी जात होते. दरम्यान ट्रॅक्टर क्र एमएच 25 बीएफ 4161 चा चालक आरोपी नामे- विष्णु सुर्यकांत कदम यांनी त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर हा हायगयी व निष्काळजीपणे चालवून लक्ष्मण शिंदे यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात लक्ष्मण शिंदे हे गंभीर जखमी होवून उपचार दरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-भरत नामदेव गुळवे, वय 28 वर्षे, रा. खुदावाडी ता.तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.19.11.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106(1)अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे मयत नामे-आप्पा शंकर गायकवाड, वय 90 वर्षे, रा. थेरगाव जि. पुणे हे दि.16.06.2025 रोजी 19.30 वा. सु. गावसुद पोहणेर जाणारे रोडवर धाराशिव येथुन पायी जात होते. दरम्यान अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे हायगयी व निष्काळजीपणे चालवून आप्पा गायकवाड यांना धडक दिली. या अपघातात आप्पा शंकर गायकवाड हे गंभीर जखमी होवून मयत झाले. नमुद अज्ञात वाहन चालकाने जखमीस दवाखान्यात उपचारकामी न नेता व अपघाताची माहिती न देता तसाच निघून गेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- गजानन खंडोजी कह्राळे, नेमणुक पोलीस ठाणे धाराशिव यांनी दि.19.11.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106(1), 134(अ)(ब), 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “नुकसान करणे.”
  • परंडा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे- अभिजीत पोपटराव पाटील, वय 43 वर्षे, रा. रोसा ता. परंडा जि. धाराशिव यांचे रोसा शिवारातील शेत सर्वे नं 74 (1) मधील फिर्यादी व आजुबाजूचे असणारे लोकांचे 14 एकर उसाचे क्षेत्र अज्ञात व्यक्तीने जाळुन अंदाजे चार लाख रुपयाचे नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अभिजीत पाटील यांनी दि.19.11.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे परंडा येथे भा.न्या.सं.कलम 326(एफ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक 2025 आदर्श आचारसंहिता आदेशाचे उल्लंघन करुन दगडफेक
  • करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
  • परंडा पोलीस ठाणे :आरोपी नामे-जाकीर ईस्माईल सौदागर, कैफ आब्दुल सौदागर, मोसीन जाकीर सौदागर, उबेद वाहेद आत्तार, रहिमान सौदागर, औरब वाहेद सौदागर, फाजील ईस्माईल सौदागर, गबु ईस्माईल सौदागर, वाहेद ईस्माईल सौदागर, सोनु आत्तार रहिमान सौदागर शर्फराज महंमद शरिफ कुरेशी, शेरु ईस्माईल सौदागर, नसीम अहमद पठाण, शफी अहमद पठाण, इरफान जब्बार शेख, मुनाफ सौदागर, ईफु निसार सौदागर, नुतलिब आब्दुल सत्तार कुरेशी, ईस्माईल सत्तार कुरेशी, मोसीन दस्तगीर कुरेशी, सम्मद अब्दुल सत्तार कुरेशी, रफीक कुरेशी, ईरशाद आलीशान कुरेशी, बिलाल खुद्रुस कुरेशी, अलिशान कुरेशी सर्व रा. परंडा ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.18.11.2025 रोजी 15.00 वा. सु. नगर परिषद कार्यालय परंडा येथे नामनिर्देशन फॉर्म छाननीच्या ठिकाणी सभागृह येथे व नगर परिषद कार्यालयाचे मुख्य गेटवर परंडा येथे नमुद आरोपींनी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक 2025 आदर्श आचारसंहिता आदेशाचे उल्लघन करुन निवडणुक कामकाज या मध्ये गोंधळ निर्माण करुन नगर पालिकेच्या मुख्यप्रवेशद्वारावर दगडफेक करुन शासकीय मालमत्तेस, स्वत:चे व इतरांचे जिवीतास धोका निर्माण केला व मा. जिल्हाधिकारी धाराशिव यांचे आदेशाचे उल्लघंन केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-राहुल बंडु रणदिवे, व्य- नगर अभियंता नगर परिषद कार्यालय परंडा रा. बावची रोड परंडा ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.19.11.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे परंडा येथे भा.न्या.सं.कलम 223, 221, 189(2), 191(2), 190, 125, 194(2) सह कलम 135 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
  • “अवैध मद्य विरोधी विशेष मोहिमेदरम्यान जिल्हा भरात 13 छापे.”
  • मा.पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली काल बुधवार दि.19.11.2025 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 13 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला गावठी दारु निर्मीतीचा सुमारे 6,400 लि. आंबवलेले रासयनिकद्रव्य हे नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नष्ट करण्यात आले. तर सुमारे 664 लि. गावठी दारु देशी- विदेशी दारुच्या 13 सिलबंद बाटल्या असे मद्य जप्त करण्यात आले. सदर ओतून दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थासह मद्यनिर्मीती साहित्य व जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 6,01,450 ₹ आहे. यावरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 13 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.
  • 1) ढोकी पोलीस ठाण्याच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-दिपक नवनाथ राठोड, वय 34 वर्षे,फुलाबाई गंगाराम जाधव, वय 55 वर्षे, अशोक तुकाराम चव्हाण, वय 37 वर्षे, सर्व रा. तावरजखेडा जमान तांडा ता.जि.धाराशिव हे 09.00 वा. सु. आपल्या राहत्या घराचे बाजूस तावरजखेडा लमान तांडा येथे अंदाजे 2,94,000 किंमतीचे गावठी दारु निर्मीतीचे 3,400 लि. गुळमिश्रीत रसायनिक द्रव व 190 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे- नागनाथ किसन राठोड, वय 45 वर्षे, गणेश व्यंकट पवार, वय 33 वर्षे, उषाबाई भारत राठोड, वय 55 वर्षे, सर्व रा. तावरजखेडा लमान तांडा ता. जि. धाराशिव हे 10.00 वा. सु. राहते घराचे बाजूस तावरजखेडा लमान तांडा येथे अंदाजे 2,63,000 किंमतीचे 3,000 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व गावठी दारु 230 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
  • 2) तामलवाडी पो.ठा. च्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-यशवंत खेमा राठोड, वय 42 वर्षे, रा.बक्षी हिप्परगा ता.दक्षिण सोलापूर जि. सोलापूर हे 09.00 वा. सु. सुरतगाव ते पिंपळा खुर्द जाणारे रोडचे बाजूस अमोल जांबुवत काळेक यांचे घराचे बाजूस सुरतगाव येथे अंदाजे 5,000 किंमतीची 47 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.तर आरोपी नामे-इंदुबाई रामा पवार, वय 85 वर्षे, रा. गंजेवाडी पारधी पिडी ता तुळजापूर जि. धाराशिव या 16.30 वा. सु.गंजेवाउी पारधी पिढी येथे मोकळ्या जागेत अंदाजे 1,300 किंमतीची 15 लिटर गावठी दारु जप्त करण्यात आली.
  • 3)लोहारा पो.ठा. च्या पथकाने 3 ठिकाणी छापे टाकले. आरेापी नामे-विजय लक्ष्मण कलेमुळे, वय 21 वर्षे, रा.लोहारा बु. जि. धाराशिव हे 15.30 वा. सु. लोहारा बु. येथील बसस्थानक च्या पाठीमागे मोकळ्या जागेत अंदाजे 4,000 ₹किंमतीची सिंधी ताडी अम्ली पदार्थ जप्त करण्यात आले. तर आरोपी नामे-मच्छींद्र प्रभु पुरी, वय 61 वर्षे, रा. तावशीगड ता.लोहारा जि.धाराशिव हे 13.13 वा. सु. तावशीगड येथील तुळजाभवानी हॉटेलच्या बाजूला अंदाजे 4,700 किंमतीची 47 लिटर गावठी दारु जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-गोविंद श्रीमंत चव्हाण, वय 38 वर्षे, रा. होळी तांडा ता. लोहारा जि.धाराशिव हे 16.40 वा. सु. होळी तांडा येथे शिवारातील शेतात अंदाजे 5,000 किंमतीची 50 लिटर गावठी दारु जप्त करण्यात आली.
  • 4)कळंब पो.ठा. च्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरेापी नामे-राणी शंकर काळे, वय 38 वर्षे, रा.इंदिरा नगर दत्तनगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव या 18.10 वा. सु. इंदिरा नगर दत्तनगर कळंब येथे अंदाजे 4,500 ₹किंमतीची 45 लिटर गावठी दारु जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-साखरबाई बाळु पवार, वय 38 वर्षे, रा. मार्केट यार्ड कळंब ता. कळंब जि.धाराशिव हे 18.30 वा. सु. मार्केट यार्ड कळंब येथे अंदाजे 4,000 किंमतीची 40 लिटर गावठी दारु जप्त करण्यात आली.
  • 5)आनंदनगर पो.ठा. च्या पथकाने 1 छापा टाकला. आरोपी नामे- बालाजी दिलीप पवार, वय 35 वर्षे, रा. वैराग रोड फकीरा नगर धाराशिव ता. जि. धाराशिव हे 19.00 वा.सु. जिल्हा परिषद धाराशिव ते समर्थ नगर धाराशिव असे जाणारे महिला व बालविकास ऑफीसचे बाजूला असलेल्या रोडवर अंदाजे 6,040 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
  • 6)मुरुम पो.ठा. च्या पथकाने 1 छापा टाकला. आरोपी नामे- दिलीप तात्याराव राठोड, वय 36 वर्षे, रा. आलुर ता. उमरगा जि. धाराशिव हे 20.30 वा. सु. आलुर ते बेळंब जाणारे रोडच्या पत्राच्या शेड मध्ये आलुर येथे अंदाजे 3,000₹ किंमतीची लिटर गावठी दारु व देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
  • 7)परंडा पो.ठा. च्या पथकाने 1 छापा टाकला. आरोपी नामे- मुन्ना भारत चौतमहाल, वय 35 वर्षे,भिम नगर भोत्रा रोड परंडा ता. परंडा जि. धाराशिव हे 16.40 वा. सु. होळी तांडा येथे शिवारातील शेतात अंदाजे 5,000₹ किंमतीची 50 लिटर गावठी दारु जप्त करण्यात आली.
  • 8)आंबी पो.ठा. च्या पथकाने 1 छापा टाकला. आरोपी नामे- युवराज उमराव ढवळे, वय 28 वर्षे, रा. देवळगाव ता. परंडा जि. धाराशिव हे 16.30 वा. सु. माउली पान सेंटरच्या आडोशाला देउळगाव येथे अंदाजे 910₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 13 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!