लातूर –शोधून पहा,जगात कुठेच गाव्हणार नाही,क्रांतीचा सूर्य उगवला,त्या महू गावात..! एकाहून एक सरस असणाऱ्या किमान पन्नासच्या वर मुखोद्गगत गीत रचना सतत गुणगणत असणाऱ्या लातूर तालुक्यातील एकुरका येथील सुभद्रा भगवान धावारे यांना प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्था,कळंबचा भीम कोकिळा–२०२५ हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. संगमेश्वर मंगल कार्यालय लातूर येथे आयु.प्रज्ञा व आयु.हर्षवर्धन काकासाहेब पोटभरे यांच्या मंगल परिणयात अशिक्षित असणाऱ्या ग्रामीण कलावंत सुभद्रा वाघमारे यांनी काही भीम गीते सादर केली. मोल मजुरी करून उदरनिर्वाह करत विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऋणातून उत्तराई होण्याचा प्रयत्न करणाऱ्या या गायीकेस शासनाकडून वयाची साठ वर्षे पूर्ण झाली तरी कसलेही मानधन मिळत नाही.ही शोकांतिका त्यांनी व्यक्त केली. कसल्याही प्रकारचे वाद्य किंवा संगीता शिवाय गोड आणि कोकिळेच्या आवाजातील भीम गीते गाणाऱ्या सुभद्रा भगवान धावारे यांना भीम गोकीळा हा मानाचा पुरस्कार दि.२६ नोव्हेंबर २०२५ रोजी कळंब येथे सन्मानपूर्वक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष सुभाष घोडके यांनी कळविले आहे.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी