धाराशिव (जिमाका) — दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार दिव्यांग क्षेत्रात कार्य करण्यासाठी कलम ५१ व ५२ अन्वये संबंधित संस्थांची नोंदणी करणे अनिवार्य आहे. या नोंदणीसाठी आयुक्त,दिव्यांग कल्याण आयुक्तालय,पुणे यांच्याकडून प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. धाराशिव जिल्ह्यातील ज्या संस्थांना दिव्यांग क्षेत्रात कार्य करावयाचे आहे त्यांनी ३० नोव्हेंबर २०२५ पूर्वी आपले प्रस्ताव सादर करावेत,असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे. नोंदणीचे प्रस्ताव जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी,जिल्हा परिषद,धाराशिव यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष सादर करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य