March 26, 2026

लहान मुलांना कपडे देऊन परिवर्तनीय बालदिन साजरा — श्यामसुंदर पाटील

  • कळंब – समाजातील गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याच्या उद्देशाने जेष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरू जयंती निमित्त विशेष उपक्रम राबवत परिवर्तनीय असा बालदिन साजरा करण्यात आला असून या उपक्रमात परिसरातील लहान मुलांना नवीन तसेच गरमीच्या कपड्यांचे वाटप करून त्यांच्यात आनंदाची आणि उत्साहाची भावना निर्माण करण्यात आली असल्याचे प्रतिपादन श्यामसुंदर पाटील यांनी अध्यक्षीय भाषणातून केले.
    पंडित जवाहरलाल नेहरू जयंती निमित्त बालदिन साजरा करण्याची पारंपरिक पद्धत असली तरी या वर्षी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प महादेव महाराज आडसूळ यांनी दि.१४ नोव्हेंबर २०२५ रोजी कळंब येथील विरंगुळा केंद्र व प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्था संचलित साक्षी कोचिंग क्लासेस वर सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारी ही वेगळी संकल्पना राबवली.छोट्या प्रयत्नातून समाजात सकारात्मकता निर्माण व्हावी आणि मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलावे हेच या उपक्रमामागचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे महादेव महाराज यांनी प्रस्तावनेतून सांगितले.
    याप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे,मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड,ज्येष्ठ विधीज्ञ त्रिंबक मनगिरे,सहशिक्षक संजय घोगरे,संतोष पुरी,शेळके यांनी बाल दिनाच्या शुभेच्छा देत आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुभाष घोडके व आभार सचिव अविनाश घोडके यांनी मानले.
    कपडे व स्वेटर मिळाल्याने मुलांमध्ये आनंदाचे वातावरण होते.उपस्थित पालकांनीही या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.
    सामाजिक जाणिवेतून राबवलेल्या या उपक्रमामुळे बालदिनाला वेगळी आणि अर्थपूर्ण दिशा मिळाली.
error: Content is protected !!