February 9, 2026

कळंब नगरपरिषद निवडणूक २०२५ : प्रभाग क्रमांक ९ मधून शंतनु शरद खंदारे यांच्या नावाला नागरिकांची पसंती

  • कळंब – येऊ घातलेल्या कळंब नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ मधून सर्वसाधारण पुरुष गटासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शंतनु शरद खंदारे हे आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांमध्ये त्यांना मोठी पसंती मिळत असून सर्वानुमते त्यांचे नाव पुढे येत आहे.
    सुशिक्षित,वैचारिक व सामाजिक बांधिलकी असलेले,दांडगा जनसंपर्क व संघटनात्मक अनुभव असलेले शंतनु खंदारे हे सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून ओळखले जातात.महिलांचा सन्मान,ज्येष्ठांचा आदर, दीन-दलित व शेतकरी-कष्टकरी बांधवांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील भूमिका आणि प्रशासनावरची पकड या गुणांमुळे प्रभागातील मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक भावना निर्माण झाल्या आहेत.
    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांना अधिकृत उमेदवारी जाहीर होणार असल्याची चर्चा असून,पक्षनिष्ठा व नेतृत्वाचा विश्वास यांच्या जोरावर ते सध्या युवक प्रदेश सरचिटणीस तसेच हिंगोली जिल्हा निरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.२०१४ पासून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय सदस्य आहेत.
    खंदारे यांच्यावर विद्यार्थी जीवनापासून पुरोगामी विचारांचा प्रभाव असून त्यांची पार्श्वभूमी समाजवादी विचारसरणीशी निगडित आहे.त्यांच्या कुटुंबाचा शिक्षण व समाजकारणाशी जवळचा संबंध आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध असून विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही,असा त्यांनी जनतेसमोर निर्धार व्यक्त केला आहे.
    कोविड काळात सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी नागरिकांना मदतीचा हात दिला होता.मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे व पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध असून विद्यार्थी व युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे.
    प्रभाग क्रमांक ९ मधील सर्व समाजघटकांना एकत्र घेऊन सर्वांगीण विकास घडवण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. धर्मनिरपेक्षता व सर्वधर्मसमभावाच्या अजितदादा पवार यांच्या विचारधारेचे ते समर्थक असून,जनतेने संधी दिल्यास प्रभागाचा चेहरामोहरा बदलण्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
    शंतनु शरद खंदारे यांची स्वच्छ प्रतिमा,प्रबळ जनसंपर्क व तरुण नेतृत्वाची झलक पाहता प्रभाग क्रमांक ९ मध्ये त्यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निश्चित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
error: Content is protected !!