धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.08 नोव्हेंबर रोजी मोटार वाहन कायदा-नियम भंग प्रकरणी एकुण 57 कारवाया करुन 43,200 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
भुम पोलीस ठाणे:आरोपी नामे-सिंधुबाई बलभिम काळे, वय 56 वर्षे, रा. कल्याणनगर भुम ता. भुम जि. धाराशिव या दि.08.11.2025 रोजी 08.20 वा. सु आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 1,000 ₹ किंमतीची 10लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-साखरबाई दत्ता पवार, वय 50 वर्षे, रा. कल्याणनगर पारधी पीडी भुम ता. भुम जि. धाराशिव या दि.08.11.2025 रोजी 09.15 वा. सु भुम बसस्थानक समोर मोकळ्या जागेत अंदाजे 1,000 ₹ किंमतीची 10 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये भुम पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
उमरगा पोलीस ठाणे:आरोपी नामे-संजय उमाज राठोड,रा. पळसगाव तांडा ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.08.11.2025 रोजी 07.40 वा. सु पळसगाव साठवण तलावाचे बाजूला अंदाजे 1,03,000 ₹ किंमतीची 150लिटर गावठी दारु व 2,200 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-जयचंद लक्ष्मण राठोड, रा. पळसगाव तांडा ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.08.11.2025 रोजी 08.30 वा. सु आपल्या शेतात अंदाजे 1,32,000 ₹ किंमतीची 3,000 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 120 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये उमरगा पो ठाणे येथे स्वतंत्र 2गुन्हे नोंदविले आहेत.
आनंदनगर पोलीस ठाणे:आरोपी नामे-आदित्य आनंत माने, वय 21 वर्षे, रा. जुनी गल्ली धाराशिव ता. जि. धाराशिव हे दि.08.11.2025 रोजी 12.00 वा. सु लहुजी साळवे चौक धाराशिव येथे अंदाजे 5,960 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 16 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. तर आरोपी नामे-नितीन अभिमान उबाळे, वय 32 वर्षे, रा.अजिंठानगर भिमनगर धाराशिव ता. जि. धाराशिव हे दि.08.11.2025 रोजी 14.30 वा. सु बसस्थानक धाराशिव शेजारी हॉटेल प्रदीप समोर अंदाजे 3,000 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 21 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये आनंदनगर पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
कळंब पोलीस ठाणे:आरोपी नामे-सतीश प्रकाश यादव, वय 33 वर्षे, रा. हासेगाव के ता.कळंब जि. धाराशिव हे दि.08.11.2025 रोजी 17.50 वा. सु हॉटेंल ताराचे पुढे टपरीमध्ये अंदाजे 960 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 24 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
उमरगा पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.08.11.2025 रोजी 14.00 वा. सु. उमरगा पो ठाणे हद्दीत पुजारी टी हाउसचे समोर छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-सचिन चंद्रकांत बनसोडे, वय 40 वर्षे, रा. शासकीय नगर झोपडपट्टी उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव 14.00 वा. सु. पुजारी टी हाउसचे समोर कल्याण मटका जुगाराचे साहित्या एकुण 1,680 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम-12 (अ) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
आनंदनगर पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान आनंदनगर पोलीसांनी दि.08.11.2025 रोजी 12.15 वा. सु. आनंदनगर पो ठाणे हद्दीत हॉटेल प्रेस्टीज समोर टपरीमध्ये छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-जमीर हबीब तांबोळी, वय 38 वर्षे, रा. आगड गल्ली ता. जि. धाराशिव 12.15 वा. सु. हॉटेल प्रेस्टीज समोर टपरीमध्ये कल्याण मटका जुगाराचे साहित्या एकुण 17,040 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आनंदनगर पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम-12 (अ) अन्वये आनंदनगर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव शहर पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव शहर पोलीसांनी दि.08.11.2025 रोजी 16.10 वा. सु. धाराशिव शहर पो ठाणे हद्दीत जे के पान स्टॉलचे पाठीमागे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-जाकीर बाबु तांबोळी, वय 42 वर्षे, साबेर अली तांबोळी, वय 25 वर्षे, रा. आगड गल्ली ता. जि. धाराशिव 16.10 वा. सु. जेके पान स्टॉलचे पाठीमागे कल्याण मटका जुगाराचे साहित्या एकुण 38,790 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले धाराशिव शहर पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम-12 (अ) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान येरमाळा पोलीसांनी दि.08.11.2025 रोजी 16.15 ते 16.55 वा. सु. येरमाळा पो ठाणे हद्दीत 2 ठिकाणी छापे टाकले. यावेळी आरोपी नामे-दत्तात्रय बुबासाहेब देशमुख, माधव उत्तरेश्वर तौर, बालाजी लिंबराज सोनवणे, सर्व रा. गौर ता. कळंब जि. धाराशिव 16.15 वा. सु. ग्रामपंचायत गाळ्याच्या समोर मोकळ्या जागेत तिरट मटका जुगाराचे साहित्या सह दोन मोबाईल फोन असे एकुण 21,800 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले येरमाळा पो. ठाणेच्या पथकास आढळले.तर आरोपी नामे-तानाजी खंडु शिरसठ, तय्यब अन्सार शेख, उमेश रमेश कोरे, सर्व रा. भोसा ता. कळंब जि. धाराशिव 16.55 वा. सु. गौर येथे मारुती मंदीराचे पाठीमागील शेडमध्ये तिरट मटका जुगाराचे साहित्या सह तीन मोबाईल फोन असे एकुण 27,560 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले येरमाळा पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम-12 (अ) अन्वये येरमाळा पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
“रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे नोंद.”
उमरगा पोलीस ठाणे: आरेापी नामे- अझरुदृदीन इकबाल कुरेशी, वय 25 वर्षे, रा. काळे प्लॉट उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.08.11.2025 रोजी 12.09 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे ॲटो रिक्षा क्र एमएच 25 एके 2296 व ऑटेा रिक्षा क्र एमएच 25 एके2695 हे आरोग्य कॉर्नर उमरगा येथे व बसस्थानक उमरगा येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या रस्त्यावर केलेले उमरगा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285 मोवाका अन्वये उमरगा पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
“ प्राण्यांना निर्दयपणे वागणुक देवून बांधून ठेवणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
परंडा पोलीस ठाणे आरोपी नामे-फिरोज जब्बार बेारी, वय 32 वर्षे, रा. इंदापुर जि. पुणे, आल्ताफ फारुक मोमीन, वय 25 वर्षे,, रा. पल्ला गल्ली परंडा, गौस अब्बास कुरेशी वय 27 देवगाव रोड परंडा ता. परंडा जि.धाराशिव यांनी दि.08.11.2025 रोजी 20.10 वा. सु.जिकिरे यांचे पडीक जमीनीमध्ये कुर्डुवाडी रोड येथे पिकअप क्र एमएच 42 बी 4203, छोटा हत्ती क्र एमएच 25 पी 5433 मध्ये गोवंशीय जातीचे 50 वासरे एकुण 2,50,000₹ किंमतीचे वाहनासह 12,50,000 ₹ किंमतीचे गोवंशीय जातीचे वासरे त्यांचे चारा पाण्याची व्यवस्था न करता निर्दयतेने कत्तलीसाठी बेकायदेशीर रित्या वाहतुक करत असताना परंडा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तींविरुध्द प्राण्यास क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 11(1),11(1)(ए),11 (1) (एफ), 11(1)(एच), 11(1) (आय) सह कलम 5(अ),5(बी), 9(ब), 11 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सह प्राण्याचे परिवहन नियम कलम 47,54,56 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
परंडा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-शिवाजी फुलचंद वाघमारे, वय 48 वर्षे, रा. साईसमर्थ निवास संगम पार्क बावची रोड परंडा ता. परंडा जि. धाराशिव यांचे राहते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 07.11.2025 रोजी 1.30 ते 15.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील 18 ग्रॅम सोन्याचे दागिने व डिव्हीआर एकुण 47,503 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शिवाजी वाघमारे यांनी दि.08.11.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331(3), 305(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-विश्वजीत उर्फ अमोल शिवाज साठे, वय 37 वर्षे, रा.माकणी ता. लोहारा जि. धाराशिव यांचे माकणी येथील दुकानाचे पाठीमागील पत्रा अज्ञात व्यक्तीने दि. 05.11.2025 रोजी 07.00 वा. सु. उचकटुन आत प्रवेश करुन दुकानातील सॅमसंग गॅलक्सी एम 31 एस मोबाईल 15,000₹, रेडमी के 20 मोबाईल 16,000₹ व रोख रक्कम 15,000 एकुण 46,000 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विश्वजीत साठे यांनी दि.08.11.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331(1), 305(ए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
तुळजापूर पोलीस ठाणे:मयत नामे-मयुरी अनिल पवार, वय 28 वर्षे, रा.सिंदफळ ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.06.09.2025 रोजी 23.00 वा. सिंदफळ येथे आपल्या राहते घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे-अक्षय चंद्रकांत शितोळे, रा. सिंदफळ ता. तुळजापूर जि. धाराशिव याने मयत मयुरी हिस दिलेल्या त्रासाला कंटाळुन मयत मयुरी यांनी आत्महत्या केली आहे. आमृ नं 76 कलम 194 बीएनएसएस चे चौकशी वरुन फिर्यादी नामे-महेश बन्सी कसबे, वय 27 वर्षे, रा. भिमनगर सिंदफळ ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.08.11.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-108 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“रस्ता अपघात.”
तामलवाडी पोलीस ठाणे: आरोपी नामे-अमित मोहन पिसे, वय 35 वर्षे, रा. शिक्षक कॉलनी म्हसवड ता. माण जि. सातारा व सोबत मयत नामे- दत्ता भगवान पिसे, वय 19 वर्षे, रा.म्हसवड, जखमी नामे- संदीप शिंदे, शिवम चव्हाण, नितीन पिसे, हे सर्व दि.21.09.2025 रोजी 19.15 वा. सु. टॅम्पो क्र एमएच 50-7925 मधून जात होते. दरम्यान माळुंब्रा शिवारात सुवर्णा पेट्रोलपंपाचे बाजूस आरेापी नामे- अमित पिसे यांनी त्याचे ताब्यातील टॅम्पो हा हायगयी व निष्काळजीपणे चालवून टॅम्पो रोडचे डिव्हायडर व त्याचे वरील जाळीस धडक दिल्याने टॅम्पो पल्टी होवून अपघात झाला. या अपघातात दत्ता पिसे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर संदीप शिंदे, शिवम चव्हाण, नितीन पिसे, जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-राजु रमेश कोडलकर, वय 33 वर्षे, रा. सिध्दनाथ मेगासिटी जय मल्हार बंगला पळकुटी रोड म्हसवड ता. माण जि. सातारा यांनी दि.08.11.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106(1), 125(ए) (बी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी पोलीस ठाणे: आरोपी नामे-यज्ञेश्वर पंडीत गपाट, व सोबत समाधान पंडीत गपाट, वय 45 वर्षे, दोघे रा. इंदापुर ता. वाशी जि. धराशिव, हे दोघे दि.23.10.2025 रोजी 22.45 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 25 बीबी9047 वरुन जात होते. दरम्यान एनएच 52 रोडचे सर्वीस रोडवर इंदापुर कडे जाणारे रोडवर आरोपी नामे- यज्ञेश्वर गपाट यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून मोटरसायकल डिव्हायडरला घासुन गाडी पडून पाठीमागे बसलेले समाधान गपाट हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-गणेश आनंतराव गपाट, वय 36 वर्षे, रा. इंदापुर ता. वाशी ह.तु. वाशी ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.08.11.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106(1), 125(ए), (बी) सह 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी पोलीस ठाणे:मयत नामे-गोरोबा लिंबाजी कोकरे, वय 54 वर्षे, व सोबत जखमी नामे- अनुसया गोरोबा कोकरे, वय 52 वर्षे,दोघे रा.बेंबळी ता. जि. धाराशिव हे दोघे दि.06.11.2025 रोजी 18.30 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 25 झेड 4187 वरुन जात होते. दरम्यान संगम धाब्या समोरील रोडवर बेंबळी शिवारात ट्रॅक्टर इंजीन नं- NSE2UYE0508 चा चालकाने त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर हा हायगयी व निष्काळजीपणे चालवून गोरोबा कोकरे यांचे मोटरसायकल पाठीमागून धडक दिली. या अपघातात गोरोबा कोकरे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर अनुसया कोकरे या जखमी झाल्या. तर नमुद ट्रॅक्टर चालक हा जखमीस उपचार कामी घेवून न जाता तसाच निघून गेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-खंडु गोरोबा कोकरे, वय 32 वर्षे, रा. बेंबळी ता. जि. धाराशिव यांनी दि.08.11.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106(1), 125(ए), (बी) सह 184, 134 (ए),(बी) मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान