कळंब — कळंब तालुका क्लिनिकल लॅबोरेटरी असोसिएशनच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच एकमताने करण्यात आली.या निवड प्रक्रियेत दिपक शेळके यांची तालुका अध्यक्ष म्हणून, अभिजीत शिंदे यांची उपाध्यक्ष म्हणून,तर निलेश हिरे यांची सचिव म्हणून एकमुखाने निवड करण्यात आली. या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष अशोक नांदे,अध्यक्षस्थानी अरुण माळी, तसेच विनायक जाधव,समाधान सुकाळे,सूरज घुगे,संभाजी कोळी, आकाश माळी,शुभम लामतुरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीनियर लॅब टेक्निशियन विनायक जाधव यांनी कुशलतेने केले. नवीन पदाधिकाऱ्यांना सर्व उपस्थित मान्यवरांकडून हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड