February 9, 2026

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.07 नोव्हेंबर रोजी मोटार वाहन कायदा-नियम भंग प्रकरणी एकुण 223 कारवाया करुन 1,78,900 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • आनंदनगर पोलीस ठाणे:आरोपी नामे-उज्वला राहुल पवार, रा.रमाई नगर धाराशिव ता. जि. धाराशिव या दि.07.11.2025 रोजी 19.15 वा. सु रमाई नगर एम आय डी सी धाराशिव येथे अंदाजे 1,550 ₹ किंमतीची 15 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये आनंदनगर पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • कळंब पोलीस ठाणे:आरोपी नामे-अमोल हरी पवार, वय 26 वर्षे, रा. पुर्नवसन सावरगाव कळंब ता.कळंब जि. धाराशिव हे दि.07.11.2025 रोजी 21.00 वा. सु पुर्नवसन सावरगाव परळी बायपास रोड कळंब येथे अंदाजे 16,000 ₹ किंमतीची 200 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव ग्रामीण पोलीसांनी दि.07.11.2025 रोजी 16.47 वा. सु. धाराशिव ग्रामीण पो ठाणे हद्दीत येडशी बार्शी रोडवर गणेश हॉटेलच्या पाठीमागील बाजूस असलेल्या रुममध्ये छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-बाळासाहेब पांडुरंग जाधव, वय 41 वर्षे,सुनिल भगवान वाघमारे, वय 39 वर्षे, आनंद सुब्राव गाढवे, वय 38 वर्षे, सर्व रा. येडशी ता. जि. धाराशिव, बलभिम जगन्नाथ जाधव, वय 43 वर्षे, रा. दरफळ ता. जि. धाराशिव 16.47 वा. सु. येडशी बार्शी रोडवर गणेश हॉटेलच्या पाठीमागील बाजूस असलेल्या रुममध्ये तिरट मटका जुगाराचे साहित्या एकुण 12,400 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले धाराशिव ग्रामीण पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम-12 (अ) अन्वये धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे नोंद.”
  • आनंदनगर पोलीस ठाणे: आरेापी नामे- अजय विश्वनाथ कुंभार, वय 22 वर्षे, रा. हिंगळजवाडी ता.जि. धाराशिव,अमोल पोपट हाजगुडे, वय 38 वर्षे, रा. किणी ता. जि. धाराशिव ह.मु. समतानगर 11 नं शाळे जवळ धाराशिव,धनंजय कोंडीबा मुंडे, वय 40 वर्षे, रा. तांबरी विभाग धाराशिव ता. जि. धाराशिव, शिवा बदन सिंग,वय 22 वर्षे,रा. ओमपुरी जि. हार्दोली राज्य उत्तर प्रदेश,ह.मु. आनंदनगर ता. जि. धाराशिव यांनी दि.07.11.2025 रोजी 12.35 ते 13.05 वा. सु. पोलीस लाईन धाराशिव, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तेरणा कॉलेज कडे जाणारे रोडवर व रोडलगत खेळणे मांडून सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या रस्त्यावर मांडलेले आनंदनगर पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285 मोवाका अन्वये आनंदनगर पो.ठा. येथे स्वतंत्र 4 गुन्हे नोंदवले आहेत.
  • भुम पोलीस ठाणे: आरेापी नामे-धनंजय किसन बसवेकर, वय 42 वर्षे, रा. नागोबा गल्ली भुम ता.भुम जि. धाराशिव यांनी दि.07.11.2025 रोजी 20.30वा. सु. आपल्या ताब्यातील टमटम हे गोलाई चौक भुम येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना भुम पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285 मोवाका अन्वये भुम पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • कळंब पोलीस ठाणे: आरेापी नामे-शंकर सिध्दलिंग तोडकर, वय 37 वर्षे, रा. भाजी मार्केटचे मागे कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.07.11.2025 रोजी 13.30वा. सु. आपल्या ताब्यातील टमटम हे होळकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना कळंब पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285 मोवाका अन्वये कळंब पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
  • शिराढोण पोलीस ठाणे:आरोपी नामे-श्याम फकीर ढावारे, वय 30 वर्षे, रा. जवळा खुर्द, ता. कळंब जि. धाराशिव,राजभाउ बाबुराव खडबडे, वय 52 वर्षे, रा. शिराढोण ता. कळंब जि. धाराशिव हे दि.07.11.2025 रोजी 20.44 ते 21.14 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे मोटरसायकल क्र एमएच 24 बीडी 5412 व मोटरसायकल क्र एमएच 25 एए 6592 या कळंब ते ढोकी जाणारे रोडवर हॉटेल पुजा बार समोर हायगयी व निष्काळजीपणे रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून कलम-185 मोवाका चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द शिराढोण पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
  • “अवैध तंबाखु पानमसाला विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
  • तामलवाडी पोलीस ठाणे :आरोपी नामे-रविकांत दिनकर इंगळे, वय 31 वर्षे, रा.मसला खुर्द ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.06.11.2025 रोजी 22.00 वा. सु.मारुती मंदीराचे शेजारी असणारे टपरीमध्ये मसला खुर्द येथे महाराष्ट्रात शासनाचे प्रतिबंधीत केलेला तत्सव पदार्थ तंबाखु जन्य पदार्थाची विक्री करीता असताना तामलवाडी पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी गुटखा साहित्यासह जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द कलम- कलम 6 (अ),24 सिगारेट व इतर तंबाखु उत्पादन जाहितरातीस प्रति व वाणिज्य पुरवठा विनीमय अधिनियम 2003 अन्वये तामलवाडी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • उमरगा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-परमेश्वर बसवणप्पा जवळगे, वय 51 वर्षे, रा. कदेर ता. उमरगा जि. धाराशिव हे त्यांचे जु्या घराला कुलूप लावून नविन घरी गेले असता अज्ञात व्यक्तीने घराचे दाराची कडी दि.05.11.2025 रोजी 21.30 ते दि. 06.11.2025 रोजी 05.00 वा. सु. कापून आत प्रवेश करुन घरातील 30 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम 30,000₹ एकुण 1,36,303₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- परमेश्वर जवळगे यांनी दि.07.11.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331(4), 305(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “रस्ता अपघात.”
  • आंबी पोलीस ठाणे: आरोपी नामे-दिपक सोमनाथ भोगील, व सोबत त्यांचे वडील सोमनाथ माणिकराव भोगील, व आई मयत नामे-मंगल सोमनाथ भोगील, वय 55 वर्षे, तिघे रा.दांडेगाव ता. भुम जि. धाराशिव हे तिघे दि.10.09.2025 रोजी 11.45 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 25 बीसी 7746 वरुन जात होते. दरम्यान दांडेगाव ते खर्डा रोडवर नळी फाट्याजवळ आरेापी नामे- दिपक भोगील यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून मोटरसायकलवर पाठीमागे बसलेल्या मंगल भोगील या मोटरसायकलवरुन खाली पडून गंभीर जखमी होवून उपचार दरम्यान मयत झाल्या. बार्शी शहर पोलीस ठाणे येथुन एमएलसी प्राप्त झाल्यावरुन पोस्टे आंबी येथे अमृ 24/2025 चौकशीवरुन फिर्यादी नामे-संध्या आण्णा साहेब भोसले नेमणुक पोलीस ठाणे अंबी यांनी दि.07.11.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106(1), 125 (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • तुळजापूर पोलीस ठाणे: फिर्यादी नामे-मंगलबाई संजय साळुंके, वय 60 वर्षे, रा. जमालपुर ता. औसा जि. लातुर व सोबत मयत नामे-महेश श्रीमंत तिप्पणबोणे, रा. नदीहत्तरगा ता. निलंगा जि. लातुर व सोबत 20 ते 25 इसम हे दि.09.10.2025 रोजी 05.15 वा. सु. लातुर ते तुळजापूर येणारे एनएच 361 रोडवर वडगाव लाख शिवारातील नायरा पेट्रोल पंपाचे पुढे काही अंतरावर रोडवरुन पायी जात होते. दरम्यान वाहन टाटा मॅजीक क्र एमएच 13 बीएन 6302 चा चालक आरेापी नामे- संतोष गोविंद पवार, रा. नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी त्याचे ताब्यातील टाटा मॅजीक वाहन हे हायगयी व निष्काळजीपणे चालवून मंगलबाई साळुंकेव महेश तिप्पणबोणे यांना पाठीमागुन धडक दिली. या अपघातात महेश तिप्पणबोणे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर मंगलबाई साळुंके या किरकोळ व गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मंगलबाई साळुंके यांनी दि.07.11.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106, 125(अ), (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “नुकसान करणे.”
  • नळदुर्ग पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-प्रशांत प्रभाकर मुळे, वय 28 वर्षे, रा. सलगरा दि. ता.तुळजापूर जि. धाराशिव यांचे सलगरा दि शिवारातील शेत गट नं 114 मधील 710 अंब्याची झाडे एकुण 1,06,500₹ किंमतीचे अज्ञात व्यक्तीने दि.06.11.2025 रोजी 20.00 वा. सु.ते दि. 07.11.2025 रोजी 07.30 वा. सु. उपटुन तोडुन फिर्यादी यांचे नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रशांत मुळे यांनी दि.07.11.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे नळदुर्ग येथे भा.न्या.सं.कलम 329(3), 324 (5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • परंडा पोलीस ठाणे :आरोपी नामे-रमेश शिवाजी लोद,गणेश शिवाजी लोद, शिवाजी देवराव लोद सर्व रा. आंतरगाव ता. भुम जि. धाराशिव यांनी कोर्टातील प्रकरनांचा निकाल विरोधात लागला या कारणावरुन फिर्यादी नामे- प्रशांत त्रिबंक गोरे, वय 49 वर्षे, रा. आंतरगाव ता. भुम जि. धाराशिव यांचे आंतरगाव शिवारातील शेत गट नं 161 मधील द्रक्षा बागेत दि.03.11.2025 रोजी 11.00 ते 17.00 वा. सु. 405 झाडांवर तणनाशक फवारुन फिर्यादी यांचे अंदाजे पाच ते सात लाखाचे नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रशांत गोरे यांनी दि.07.11.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे परंडा येथे भा.न्या.सं.कलम 324 (5), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!