मुंबई – मंत्रालयात राज्याचे परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांच्या कार्यालयात दि.७ नोव्हेंबर २०२५ वार शुक्रवार रोजी धाराशिव जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील,माजी आमदार ज्ञानराज चौगुले,शिवसेना नेते अजित पिंगळे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे,युवा नेते किरण गायकवाड,नितीन काळे,अमित शिंदे,अनंत वाघमारे,लक्ष्मीकांत हुलजुते यांसह भाजपा व शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत महायुतीकडून धाराशिव जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय घेण्यात आला.जनतेच्या विश्वासावर आधारित विकासाला प्राधान्य देत सर्वांगीण प्रगतीसाठी कार्य करण्याचा निर्धार या वेळी सर्वांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्ह्याचा विकास वेगाने होईल,असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला.महायुती आता धाराशिवच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने सज्ज झाली आहे.
More Stories
“राज्य लॉटरी आमच्या हक्कांची; नाही ‘राजश्री’च्या बापाची!” — विक्रेत्यांचा एल्गार,विक्री बंदचा इशारा
“भूमिपुत्रांचा संयम संपत चालला” — आगरी सेनेचा रास्ता रोकोचा इशारा – कैलास पाटील
मे महिन्यात तुळजाभवानी मंदिर विकासाचा शुभारंभ;१८६५ कोटींच्या आराखड्याला वेग