February 9, 2026

धाराशिव जिल्हा पोलीस नामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.03 नोव्हेंबर रोजी मोटार वाहन कायदा-नियम भंग प्रकरणी एकुण 132 कारवाया करुन 1,02,000 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • नळदुर्ग पोलीस ठाणे:आरोपी नामे-सुरेश राम रुपनुर, वय 46 वर्षे, रा.बोळेगाव ता.तुळजापूर जि. धाराशिव हे दि.03.11.2025 रोजी 14.20 वा. सु बोळेगाव येथे आपल्या राहत्या घराजवळ अंदाजे 1,200 ₹ किंमतीची 14 देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये नळदुर्ग पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे:आरोपी नामे-अलंकार दत्ता रोहीदास, वय 40 वर्षे, मकबुल आब्बु मुलानी, वय 55 वर्षे, रा.तेर ता. जि. धाराशिव हे दि.03.11.2025 रोजी 19.45 वा. सु वरुडा येथे जिल्हा परिषद शाळेच्या समोरील वरुडा ते तेर जाणारे रोडलगत एकुण 31,610 ₹ किंमतीच्या अल्टो कारसह एकुण 1,11,610 ₹ किंमतीची 130 देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • ढोकी पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान ढोकी पोलीसांनी दि.03.11.2025 रोजी 13.50 वा. सु. ढोकी पो ठाणे हद्दीत ढोकी येथे जुना पेट्रोलपंपाच्या बाजूला छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-शशिकांत आत्माराम मोरे, वय 59 वर्षे, रा.जयभवानीनगर ढोकी ता. जि. धाराशिव हे 13.50 वा. सु. कल्याण मटका जुगाराचे साहित्या एकुण 1,740 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले ढोकी पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम-12 (अ) अन्वये ढोकी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “शस्त्र कायद्यांतर्गतगुन्हा नोंद.”
  • वाशी पोलीस ठाणे :आरोपी नामे-दशरथ लाला काळे, वय 25 वर्षे, रा. सरमकुंडी ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.03.11.2025 रोजी 13.50 वा. सु.सरमकुंडी येथे आपल्या राहत्या घरात लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल असे एक पितळी मुठ असलेली तलावर अंदाजे 1,500 ₹ किंमतीचे विनापरवाना बेकायदेशीर रित्या स्वत:चे जवळ बाळगलेला वाशी पोलीसांना मिळून आला. यावर पथकाने नमुद तलवार जप्त करुन फिर्यादी नामे-नितीन भागवत जाधवर पोलीस अंमलदार नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शस्त्र कायदा कलम- 4/25 अन्वये वाशी पो. ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • आनंदनगर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-शामल लक्ष्मण खैरे, वय 40 वर्षे, रा. हिंगळजवाडी ता. जि. धाराशिव या दि.27.10.2025 रोजी 10.30 वा. सु. बसस्थानक धाराशिव येथे धाराशिव ते बार्शी बस मध्ये चढत असताना अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून शामल खैरे यांचे पर्स मधील बटव्यातील 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 9,000₹ असा एकुण 84,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शामल खैरे यांनी दि.03.11.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “रस्ता अपघात.”
  • ढोकी पोलीस ठाणे: मयत नामे-भारत बाबुराव गजधने, वय 58 वर्षे, रा.घोगरेवाडी ता. जि. धाराशिव हे दि.29.10.2025 रोजी 18.15 वा. सु. लातुर बार्शी जाणारे रोडवरील हॉटेल अंजली जवळ घोगरेवाडी येथे रोडचे कडेने पायी जात होते. दरम्यान टाटा व्हिस्टा गाडी क्र एमएच 13 बी.एन 3790 चा चालक आरोपी नामे- रामभाउ सोपान मोरे यांनी त्याचे ताब्यातील टाटा व्हिस्टा गाडी ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून भारत गजधने यांना पाठीमागुन धडक दिली. या अपघातात भारत गजधने हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रंजित भारत गजधने रा. घोगरेवाडी ता. जि. धाराशिव यांनी दि.03.11.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106(1), सह मपोका कलम 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • लोहारा पोलीस ठाणे: मयत नामे-लायकअली अलाउद्दीन मुल्ला,वय 64 वर्षे, रा.सास्तुर ता. लोहारा जि. धाराशिव हे दि.24.10.2025 रोजी 09.00 वा. सु. क्रांती चौकाकडे जाणाऱ्या सास्तुर बलसुर रोडने पायी जात होते. दरम्यान अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे हायगयी व निष्काळजीपणे चालवून लायकअली मुल्ला यांना पाठीमागुन धडक दिली. या अपघातात लायकअली मुल्ला हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर नमुद अज्ञात वाहन चालक हा अपघाताची माहिती न देता जखमीस उपचार कामी घेवून न जाता वाहनासह पसार झाला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शाहबाज लायकअली मुल्ला, रा. सास्तुर ता.लोहारा जि. धाराशिव यांनी दि.03.11.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106(1), सह मपोका कलम 134 (अ)(ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!