धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.02 नोव्हेंबर रोजी मोटार वाहन कायदा-नियम भंग प्रकरणी एकुण 149 कारवाया करुन 1,13,700 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
उमरगा पोलीस ठाणे:आरोपी नामे-शिवराज गोविंद कांबळे, वय 45 वर्षे, रा.गौतम नगर उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.02.11.2025 रोजी 11.30 वा. सु भाजी मार्केट पत्र्याचे शेडशेजारी अंदाजे 2,200 ₹ किंमतीची 22 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-दयानंद मोहन माने, वय 26 वर्षे, रा.कोकलगाव ता. निलंगा हे दि.02.1.2025 रोजी 12.00 वा. सु तलमोड बॉर्डर येथे पत्र्याचे शेडसमोर अंदाजे 3,500 ₹ किंमतीची 35 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-अविनाश केशव पवार, वय 34 वर्षे, रा.डिग्गी ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.02.1.2025 रोजी 12.00 वा. सु आपल्या राहत्या घराचे मोकळ्या जागेत अंदाजे 1,500 ₹ किंमतीची 15 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये उमरगा पो ठाणे येथे स्वंतत्र 3 गुन्हे नोंदविले आहेत.
धाराशिव शहर पोलीस ठाणे:आरोपी नामे-राहुल मुरलीधर भालेराव, वय 36 वर्षे, रा.लिंबाजी बाग तांबरी विभाग ता. जि. धाराशिव हे दि.02.11.2025 रोजी 16.40 वा. सु पालीका सार्वजनिक शैचालयाचे बाजूस मोकळ्या जागेत अंदाजे 12,000 ₹ किंमतीची 120 लिटर सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-जहीर सलीम कुरेशी, वय 34 वर्षे, रा.आझाद चौक धाराशिव ता. जि. धाराशिव हे दि.02.1.2025 रोजी 18.30 वा. सु हॉटेल कंदुरीचे बाजूला अंदाजे 680 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 17 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे स्वंतत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
“ जुगार विरोधी कारवाई.”
वाशी पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान वाशी पोलीसांनी दि.02.11.2025 रोजी 12.40 वा. सु. वाशी पो ठाणे हद्दीत हॉटेल विश्वजीत च्या समोर छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-बिस्मील्लाह शब्बीर खान, वय 25 वर्षे, रा. सनशाईन अपार्टमेंट डॉन लाईन नालासपोरा इस्ट ह.मु. सरमकुंडी फाटा ता. वाशी हे 12.40 वा. सु. हॉटेल विश्वजीत च्या समोर तिन पत्ते जुगाराचे साहित्या एकुण 980 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले वाशी पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम-12 (अ) अन्वये वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.01.11.2025 रोजी 21.45 वा. सु. उमरगा पो ठाणे हद्दीत जुनी पेठ मारुती मंदीरासमोरील फुलचंद औरादे यांचे शेडसमोर छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-गदगय्या विश्वनाथ स्वामी, संदीप बसवराज सुरपे, गुंडु माणिक कावाले, शरद रामचंद्र कदेरे, सोहेल रफिक शेख सर्व रा. उमरगा हे 21.45 वा. सु. जुनी पेठ मारुती मंदीरासमोरील फुलचंद औरादे यांचे शेडसमोर तिरट मटका जुगाराचे साहित्या एकुण 15,300 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम-12 (अ) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ प्राण्यांना निर्दयपणे वागणुक देवून बांधून ठेवणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
धाराशिव शहर पोलीस ठाणे आरोपी नामे-साबेर बुर्हान कुरेशी, वय 19 वर्षे, रा. बुधवार पेठ मोहोळ ता. मोहोळ जि. सोलापूर यांनी दि.02.11.2025 रोजी 02.15 वा. सु.अहिल्यादेवी होळकर चौक येथील ब्रिज खाली बोलेरा जिप क्र एमएच 14 एएम7559 मध्ये गोवंशीय जातीचे 2 जर्शी गायव एक कालवड असा एकुण 55,000₹ किंमतीच्या वाहनासह 7,55,000 ₹ किंमतीचे गोवंशीय जाती चे जर्शी गाय वकालवड त्यांचे चारा पाण्याची व्यवस्था न करता निर्दयतेने कत्तलीसाठी बेकायदेशीर रित्या वाहतुक करत असताना धाराशिव शहर पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तींविरुध्द प्राण्यास क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 11(1) (बी) सह कलम 5(अ)(1), 5(सी), 9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे नोंद.”
लोहारा पोलीस ठाणे: आरेापी नामे- मंगेश विश्वनाथ वकील, वय 35 वर्षे, रा. कास्ती खु. ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.02.11.2025 रोजी 15.30 वा. सु. आपल्या ताब्यातील छोटा हत्ती क्र एमएच 13 सीयु 2259 हा डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक लोहारा येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना लोहारा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285 मोवाका अन्वये लोहारा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
धाराशिव शहर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-संतोष ज्ञानदेव इंगळे, वय 42 वर्षे, रा.इंगळे गल्ली धाराशिव ता. जि. धाराशिव यांचे राहते घराचा कुलूप कोंडा अज्ञात व्यक्तीने दि.23.10.2025 रोजी 09.3 ते दि.01.11.2025 रोजी 20.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील कपाटातील व लोखंडी पेटीतील 7 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 35,000₹ असा एकुण 64,500 ₹ किंमतीचा माला चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-संतोष इंगळे यांनी दि.02.11.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 305, 331(3),331(4) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-बिभीषण सुखदेव लोकरे, वय 40 वर्षे, रा. खेर्डा ता. कळंब जि. धाराशिव यांचे खेर्डा शिवारातील शेत गट नं 49,78,106,111 एकुण 17 एकर मधील 110 क्विंटल सोयाबीन अंदाजे 4,18,000₹ किंमतीचे फिर्यादीचे भावास शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी देवून आरोपी नामे- भास्कर प्रल्हाद लोकरे, सुधकर प्रल्हाद लोकरे, बबन प्रल्हाद लोकरे, कालीदास प्रल्हाद लोकरे,सुशांत भास्कर लोकरे, प्रमोद सुधाकर लोकरे, व इतर सर्व रा. खेर्डा ता. कळंब जि. धाराशिव यांनी चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बिभीषण लोकरे यांनी दि.02.11.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2), 352, 351(2) 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-रावसाहेब रामहरी मस्के, वय 58 वर्षे, रा. धुत्ता, ह.मु. मारवाड गल्ली धाराशिव ता. जि. धाराशिव यांचे शेत गट नं 6 मध्ये धुत्ता शिवार येथील एन्सन कंपनीची 5 एच पी ची पाण्याची मोटार अंदाजे 15,000₹ किंमतीची दि.31.10.2025 रोजी 20.00वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रावसाहेब मस्के यांनी दि.02.11.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-प्रविण बसवराज पाटील, वय 43 वर्षे, रा. लोहगाव ता.तुळजापूर जि. धाराशिव यांचे लोहगाव शेततील एक मुह्रा जातीची म्हैस अंदाजे 1,00,000₹ किंमतीची ही दि.01.11.2025 रोजी 08.30 ते दि. 02.11.2025 रोजी 05.30 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रविण पाटील यांनी दि.02.11.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
तामलवाडी पोलीस ठाणे:मयत नामे-गहिनीनाथ दिगंबर पोफळे, वय 28 वर्षे, रा.गावडी दारफळ ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर यांनी दि.31.10.2025 रोजी 19.30 ते 21.00 वा. केमवाडी शिवार गट नं 253 ता. तुळजापूर मध्ये पत्र्याचे शेडमध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे-श्वेता गहीनीनाथ पोफळे, रा. गावडी दारफळ ता. उत्तर सोलापूर ह.मु. तोकर वस्ती बाळे सोलापूर ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर अजय पवार रा. गुळवंची ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर यांनी मयत गहिनीनाथ यांची पत्नी ही परपुरुषाशी व्हॅटसअप विडीओ कॉलद्वारे बोलून मयताशी भांडणतक्रारी करुन त्रास दिल्याने त्यांचे त्रासाला कंटाळुन मयत गहिनीनाथ पोफळे यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-दिगंबर बाबा पोफळे, वय 74 वर्षे, रा. गावडी दारुळ ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर धाराशिव यांनी दि.02.11.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम- 108, 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
कळंब पोलीस ठाणे :आरोपी नामे-गोकुळ तुकाराम पाडोळे, रा. मंगरुळ ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.01.11.2025 रोजी 18.00 वा. सु. बसस्थानक कळंब परिसर येथे फिर्यादी नामे-सुधाकर मल्हारी पानढवळे, वय 42 वर्षे, रा. मंगरुळ ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद अरोपीने मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुधाकर पानढवळे यांनी दि.02.11.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे कळंब येथे भा.न्या.सं.कलम 118(2), 352, 351(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
“भरदिवसा व्यावसायिकाला लुटणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.”
दिनांक 31/10/2025 रोजी माला विषयीचे गुन्हे उघडकीस आणणे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि अमोल मोरे पथक पेट्रोलिंग करत पोस्टे तुळजापूर हद्दीत असताना गुप्त बातमीवरून बातमीवरून पोलीस तुळजापूर गु.र.नं.406/2025 क.304,3 (5)BNS गुन्ह्यातील गेला माल व आरोपीचा शोध घेणे कामी सदर ठिकाणी रवाना होवून तुळजापूर येथुन आरोपी नामे-मनोज उर्फ पापा महादेव धोत्रे वय 30वर्ष रा वेताळ नगर तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यास ताब्यात घेऊन त्याचे कडे सदर गुन्ह्या बाबत चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा मी माझा साथीदार यांनी मिळून केल्याचे सांगितले. त्यावर पथकाने नमुद आरेापीच्या ताब्यातुन गुन्ह्यातील मुद्देमाल (एक रेडमी कंपनीचा मोबाईल) हस्तगत करून नमुद आरोपी पुढील तपास कामी पोलीस ठाणे तुळजापूर येथे रिपोर्ट सह हजर केले
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री, विनोद इज्जपवार,सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोह- राहुल नाईकवाडी,समाधान वाघमारे,बळीराम शिंदे,अशोक ढगारे, चालक विनायक दहिहांडे, योगेश कोळी तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोअं सुर्यवंशी, भोसले यांच्या पथकाने केली आहे.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान