धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.27 ऑक्टोंबर रोजी मोटार वाहन कायदा-नियम भंग प्रकरणी एकुण 299 कारवाया करुन 2,15,300 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
ढोकी पोलीस ठाणे:आरोपी नामे-समाबाई मोहन पवार, वय 50 वर्षे, रा.दत्तानगर पारधीपिढी ढोकी ता. जि. धाराशिव या दि.27.10.2025 रोजी 13.50 वा. सु ढोकी ते तेरणा कारखाना जाणारे रोडच्या बाजूला वस्तानगर कब्रस्थान जवळ ढोकी येथे अंदाजे 4,000 ₹ किंमतीची 40 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-सुनिता शंकर काळे, वय 30 वर्षे, रा.पारधीपिढी तेर ता. जि. धाराशिव या दि.27.10.2025 रोजी 14.10 वा. सु आपल्या राहत्या घरा समोर अंदाजे 1,440 ₹ किंमतीची 18 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये ढोकी पो ठाणे येथे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
आनंदनगर पोलीस ठाणे:आरोपी नामे-उज्वला राहुल पवार, रमाईनगर धाराशिव ता. जि. धाराशिव या दि.27.10.2025 रोजी 17.50 वा. सु रमाई उड्डाण पुलाजवळील एम.आय.डी. सी. धाराशिव येथे अंदाजे 2,200 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 10सिलबंद बाटल्या व 18 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये आनंदनगर पो ठाणे येथे येथे गुन्हा नोंदविला आहे.
शिराढोण पोलीस ठाणे:आरोपी नामे-शालुबाई दत्ता काळे, वय 42 वर्षे, रा. शिराढोण पारधी पिढी ता.कळंब जि. धाराशिव हे दि.27.10.2025 रोजी 17.35 वा. सु एकुरगा शिवारातील झोपडीचे पाइीमागील बाजूस अंदाजे 2,200 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 12 सिलबंद बाटल्या व 20 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये शिराढोण पो ठाणे येथे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
आनंदनगर पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान आनंदनगर पोलीसांनी दि.27.10.2025 रोजी 14.30 वा. सु. आनंदनगर पो ठाणे हद्दीत नगरपालिका धाराशिवच्या गेट समोर छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-दत्ता काशीनाथ तोडकरी, वय 57 वर्षे रा.गायकवाड गल्ली नेहरु चौक धाराशिव ता. जि. धाराशिव हे 14.30 वा. सु. नगरपालिका धाराशिवच्या गेट समोर गणेश कल्याण मटका जुगाराचे साहित्या एकुण 750 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आनंदनगर पो.ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम-12 (अ) अन्वये आनंदनगर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव शहर पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव शहर पोलीसांनी दि.27.10.2025 रोजी 13.40 ते 16.15 वा. सु. धाराशिव शहर पो ठाणे हद्दीत सांजा वेस गल्लीतील लातुर टिन मेकर येथील पत्र्याचे बाजूस धाराशिव येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-शकील कासीमसाब तांबोळी, वय 57 वर्षे, रा. सांजा वेस गल्ली ता.जि. धाराशिव, सोहेल अयुब अत्तार, वय 25 वर्षे, रा. पाथरुड ता. माजलगाव जि. बिड ह.मु. गालीब नगर धाराशिव ता. जि.धाराशिव हे 13.40 वा. सु. सांजा वेस गल्लीतील लातुर टिन मेकर येथील पत्र्याचे बाजूस धाराशिव येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्या एकुण 1,840 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले धाराशिव शहर पो. ठाणेच्या पथकास आढळले.तर आरोपी नामे-बाळासाहेब दत्तात्रय कदम, वय 43 वर्षे, रा.नारी ता. बार्शी जि. सोलापूर हे 15.30 वा. सु. धाराशिव ते सांजा जाणारे रोड लगत इंदीरानगर येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्या एकुण 14,900 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले धाराशिव शहर पो. ठाणेच्या पथकास आढळले. तर आरोपी नामे-उत्तम विष्णु माने, वय 52 वर्षे, रा.इंदीरानगर धाराशिव ता. जि. धाराशिव हे 16.15 वा. सु. धाराशिव ते सांजा जाणारे रोडलगत जेके पान स्टॉलचे बाजूस कल्याण मटका जुगाराचे साहित्या मोबाईल एकुण 2,700 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले धाराशिव शहर पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम-12 (अ) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
उमरगा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-संजिवनी हरिदास साळुंके, वय 40 वर्षे, रा. काळा मठ पतंगे रोड उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांचे राहते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.26.10.25 रोजी 02.00 ते 03.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन कपाटामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने, टॅब व रोख रक्कम 90,000₹ असा एकुण 1,25,000₹ किंमतीचा माल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-संजिवनी साळुंके यांनी दि.27.10.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331(4), 305(अ), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
भुम पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-बालाजी भारत गायकवाड, वय 41 वर्षे, रा. घर मालक लहु उत्तम कुठे यांचे विजयनगर भुम ता. भुम जि. धाराशिव यांचे राहते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.17.10.25 रोजी 17.30 ते दि. 21.10.2025 रोजी 18.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन कपाटामध्ये ठेवलेले 35 भार चांदीचे दागिने, एकुण 20,000₹ किंमतीचा माल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बालाजी गायकवाड यांनी दि.27.10.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331(4), 305 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-प्रविण कुंडलिक साळवे, वय 32 वर्षे, रा. मसला खु. ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे भाउ नामे प्रदिप कुंडलिक साळवे यांचे राहते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.26.10.25 रोजी 23.00 ते दि. 27.10.2025 रोजी 05.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन कपाटामध्ये ठेवलेले 24 सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, असा एकुण 1,37,000₹ किंमतीचा माल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रविण साळवे यांनी दि.27.10.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331(4), 305 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव शहर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-रेखा रविंद्र काकडे, वय 70 वर्षे, रा. पांगरी ता. बार्शी जि. सोलापूर या दि.27.10.2025 रोजी 11.23 वा. सु. सरकारी दवाखाना धाराशिव येथे उपचार करीता आल्या असता रेखा काकडे यांचे पर्स मधील रोख रक्कम 25,000₹ 3 ग्रॅमचे सोन्याचे दागिने असा एकुण 36,500₹ किंमतीचा माल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रेखा काकडे यांनी दि.27.10.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2), अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-औदुंबर अरुण पाटील, वय 52 वर्षे, रा. भिकार सारोळा ता. जि. धाराशिव यांचे भिकारसारोळा शिवारातील शेतगट नं 60 मधील विहीरीवरील 3 एच पी ची पानबुडी मोटार व केबल 100 फुट र्स्टाटर असा एकुण 15,000₹ किंमतीचा माल दि.21.10.2025 रोजी 20.30 ते 24.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-औदुंबर पाटील यांनी दि.27.10.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2), 324(4) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
आंबी पोलीस ठाणे :आरोपी नामे-शिवाजी जाधव व तीन अनोळखी इसम रा. डोंजा ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.25.10.2025 रोजी 09.00 ते दि. 26.10.2025 रोजी 18.30 वा. सु. डोंजा येथे फिर्यादी नामे-उमेश नारायणलाल मीणा, वय 19 वर्षे, रा. पारसोली ता. वडीसादडी जि. चित्तोडगड राज्य राजस्थान यांना नमुद आरोपींनी किरकोळ काम करण्यासाठी शेतात आणुन उस तोडुन ट्रॉलिमध्ये भरायचे काम करायचे आहे व सदर कामाचे पैसे तुम्हाला सहा महिन्यानंतर मिळतील असे म्हणुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, उसाने मारहाण करुन जखमी केले. फिर्यादीचे मित्रास ही शिवीगाळ करुन उसाने मारहाण केली. तुम्हाला काम करायचे नसेल तर 40,000₹ परत द्या नाहीतर तुम्ही येथुन कसे जाता असे म्हणून पकडून ठेवून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- उमेश मीणा यांनी दि.27.10.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे आंबी येथे भा.न्या.सं.कलम 146(2), 126(2), 118(3),115 (2), 351(2)(3), 3(5) सह कलम 12 वेटबिगारी प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“रस्ता अपघात.”
शिराढोण पोलीस ठाणे: मयत नामे-कृष्णा भाउ काळे, वय 1 वर्षे 6 महिने रा.शिराढोण पारधी पिडी ता. कळंब जि. धाराशिव हे दि.26.10.2025 रोजी 14.00 वा. सु. शिराढोण पारधी पिडी येथे घरासमोर असताना ट्रॅक्टर क्र एमएच 25 बी.ए. 7893 चा चालक आरोपी नामे- पवन नाना काळे, रा. शिराढोण पारधी पिढी ता. कळंब जि. धाराशिव यांनी त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर हा हायगयी व निष्काळजीपणे चालवून कुठलाही परिस्थीतीचा अंदाज न घेता पाठीमागे रिवर्स घेत असताना कृष्णा काळे यास धडक दिली. या अपघातात कृष्णा काळे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-भाउ राजेंद्र काळे, वय 29 वर्षे, रा. शिराढोण पारधी पिढी ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.27.10.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106(1), 125(अ),(बी) सह मपोका कलम 184, 134 (अ) (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
“मोटार सायकल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.”
04 मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस ….
स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक हे धाराशिव जिल्ह्यातील अभिलेखावरील गुन्हे उघडकीस आणणेकामी रवाना होवून कळंब येथे आले असता पथकास गोपनीय बातमीदार यांचे मार्फत माहिती मिळाली की, दोन इसम चोरीच्या मोटारसायकल विकत आहेत. प्राप्त झालेल्या माहितीवरुन तात्काळ नमुद इसमाचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेवून चोरीच्या मोटारसायकल बाबत विचारणा केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना विश्वासात घेवून विचारणा केली असता त्यांनी त्यांच्या अन्य एका साक्षीदारासह चोरुन आणलेल्या मोटारसायकल त्यांच्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या ताब्यात एकूण ०4 मोटारसायकल मिळून आल्या. धाराशिव जिल्हा गुन्हे अभिलेख तपासला असता नमुद मोटारसायकल या पोस्टे आनंदनगर, तुळजापूर, येरमाळा व मुरुड जिल्हा लातूर हददीतुन चोरीस गेल्या असल्याचे दिसून आले. नमुद दोन आरोपींना तसेच 01,55,000 रु किमतीच्या एकूण ०4 मोटार सायकल सह ताब्यात घेवून त्यांना पुढील कारवाईस्तव पोस्टे हजर करण्यात आले़ आहे. ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव 1)अर्जुन साहेबराव काळे वय 29 वर्ष रा. वाकडी पारधी पिढी ता. कळंब जि. धाराशिव 2) नितीन विश्वास शिंदे वय 25 वर्ष रा नांदूर ता केज जि बीड ह. मु. मांडवा ता वाशी जि धाराशिव असे असून त्याचेकडून एकुण ०4 मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून पोलीस त्याचे अन्य साथीदाराचा शोध घेत आहेत.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री, विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार,पोहेका शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, चापोका रत्नदीप डोंगरे, नागनाथ गुरव यांच्या पथकाने केली आहे. (सोबत छायाचित्र जोडले आहे.)
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान