उमरा — अंगणवाडी क्र. ९१७ विभाग येरमाळा येथे आठवा राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येरमाळा विभाग प्रमुख श्रीमती बोरफळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात महिलांना संतुलित आहार, बालकांचे संगोपन, गर्भवती व स्तनदा मातांचे पोषण तसेच किशोरी मुलींसाठी योग्य आहार याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा परिषद शिक्षिका श्रीमती कवडे यांनी केली, तर आभार श्रीमती दिपाली जाधव यांनी मानले. अंगणवाडी व आशा कार्यकर्त्यांसह गावातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्थानिक अन्नधान्यापासून पौष्टिक आहार तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. महिलांनी उत्साहाने प्रश्न विचारत अनुभवही मांडले. श्रीमती दिपाली जाधव यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमाचा समारोप “निरोगी कुटुंब हेच समृद्ध समाजाचा पाया” या संदेशाने करण्यात आला.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी