कळंब – मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे शेतकरी,सामान्य नागरिक आणि जनावरे यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.या कठीण काळात पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते निखिल काळकुटे यांनी मानवतेचा खरा धर्म म्हणजे मदत हा संदेश देत आदर्शवत कार्य हाती घेतले आहे. आमदार महेशदादा लांडगे (भोसरी) व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काळकुटे व त्यांच्या टीमने मराठवाड्यातील विविध भागांमध्ये पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणावर मदतकार्य राबवले.या उपक्रमांतर्गत तब्बल १५,००० हून अधिक किराणा कीट वितरित करण्यात आले आहेत. कळंब तालुक्यातील मंगरुळ व पारा या पूरग्रस्त गावांमध्ये काळकुटे यांच्या सोबत प्रणव नरहिरे, मकरंद पाटील, परशुराम देशमाने, दादा खंडागळे, निखिल भडांगे, तसेच भाजप कळंब व रोटरी क्लब कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने ३०० हून अधिक किराणा कीट वाटप करण्यात आले. पूरामुळे शेतकऱ्यांची पिके, घरे व उपजीविकेची साधने वाहून गेली असून, अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. अशा वेळी पुण्याहून तब्बल ३५० किमी अंतरावर असलेल्या कळंबपर्यंत जाऊन केलेले हे मदतकार्य म्हणजे मानवतेचे जिवंत उदाहरण ठरले आहे. या सामाजिक उपक्रमाची प्रेरणा आमदार महेशदादा लांडगे यांनी दिली असून, त्यांच्या मार्गदर्शनामुळे हा प्रयत्न यशस्वीपणे पार पडला आहे. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत, “मानवतेचा धर्म जपणाऱ्यांचे कार्य समाजाला एकतेचा आणि करुणेचा नवा अर्थ शिकवते,” अशी भावना व्यक्त केली.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन